एंगेजमेंटला कोट्यावधीची अंगठी मिळाली या नायिकांना

Sonam Kapoor - Kareena Kapoor

बॉलिवूड (Bollywood) म्हणजे पैशांचा खेळ. येथील कमी शिकलेले कलाकारही कोट्यावधींच्या घरात खेळत असतात. एकेका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये कलाकार घेऊ लागले आहेत. एखादा चित्रपट हिट झाला की त्यांच्या मानधनात आणखी वाढ होते. केवळ बॉलिवूडच नव्हे तर क्रिकेट आणि उद्योगधंद्यातही असा पैसा असल्यानेच तो मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. पैसा खर्च करण्यासाठी सगळ्यात मोठा सण म्हणजे लग्न. या मोठ्या लोकांचे सगळे काही भव्य दिव्यच असते. त्यामुळे एंगेजमेंटला अनेक नायिकांना कोट्यावधींच्या अंगठ्या त्यांच्या भावी वराने देऊन त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. लग्नाचे ड्रेस आणि रिसेप्शनचा खर्च तर आणखीनच वेगळा असतो.

प्रख्यात अभिनेत्री तापसी पन्नूचे नुकतेच लग्न झाले. तिच्या लग्नाच्या बातम्या, फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आता तर तिने मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेलेली असतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न झालेल्या तापसीला गौतमने एंगेजमेंटच्या वेळी दीड कोटींची हिऱ्यांची अंगठी दिल्याचे सांगितले जात आहे.

तापसीला दीड कोटीची अंगठी मिळाली असली तरी सगळ्यात महागडी अंगठी अभिनेत्री असीनला मिळालेली आहे. असीनने जेव्हा प्रख्यात उद्योगपती राहुल शर्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने एंगेजमेंटच्या दिवशी असीनला 20 कॅरेटची जी अंगठी दिली तिची किंमत थोडी थोडकी नव्हे तर चक्क सहा कोटी रुपये आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या हातात आपल्याला नेहमी हिऱ्यांची अंगठी दिसते. ही अंगठी तिचा पति व्यावसायिक राज कुंद्राने तिला दिली असून याची किंमत तीन कोटी रुपये आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दोघेही बॉलिवूडमधील प्रख्यात नायक-नायिका आहेत. या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा रणवीरने दिपीकाला 2.7 कोटींची अंगठी दिल्याचे सांगितले जाते. या दोघांनी इटलीमध्ये भव्यतेने लग्न तर केलेच. मुंबईतही मित्रांसाठी भव्य रिसेप्शनचे आयोजन केले होते.

बॉलिवूडमध्ये अनेक अफेयर करून हॉलिवूडच्या निक जोनासबरोबर प्रियांका चोप्राने लग्न केले. लग्नात निकने प्रियांकाला महागडी कार भेट म्हणून दिली. तसेच एंगेजमेंटच्या वेळेसही त्याने प्रियांकाला प्लॅटिनमची अंगठी दिली ज्याची किंमत 2.1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने क्रिकेटचा राजा विराट कोहलीसोबत 2017 मध्ये लग्न केले, एंगेजमेंटच्या वेळी विराटने अनुष्का शर्माच्या हातात हिऱ्यांची अंगठी घातली ज्याची किंमत एक कोटी रुपये आहे.

सोनम कपूरने जेव्हा बॉयफ्रेंड उद्योगपती आनंद अहूजाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने तिला 90 लाखांची अंगठी दिली होती.

अमृता सिंह सोडून गेल्याने एकटा असलेल्या सैफचे मन करीना कपूरवर आले. त्याने करीनाचे प्रेम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही आले. करीनाचे नावही त्याने आपल्या हातावर गोंदवून घेतले होते. करीनाला लग्नाची मागणी घालताना तेव्हा त्याने तिला जी अंगठी दिली होती त्याची किंमत तेव्हा 75 लाख रुपये होती.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा अभिषेकने ऐर्श्वयाला 50 लाखांची अंगठी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER