या पाच ‘मॉर्निंग हॅबिट’ तुम्हाला बनवेल यशस्वी

Morning Habbit 1

तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनायचे असेल तर खूप काही मोठे करण्याआधी आपल्या लहान लहान सवयी सर्वात आधी बदलणे फार आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काय करावे व काय टाळावे याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊया.

बहुतेक लोकांची सकाळ हा उठल्या-उठल्या हातात मोबाई घेतल्यानंतर होते. ही सर्वात वाईट आणि चुकीची सवय आहे. कारण मोबाईल हातात घेतल्या नंतर रात्रभरात सोशल मीडियावर बरेच मेसेजेस आणि नोटिफिकेशन जमा झालेले असतात आपल्या फोटोंवर किंवा स्टेटस वर बऱ्याच जणांनी कमेंट केलेले असतात. हे नोटिफिकेशन आणि कमेंट वाचण्यामध्ये निरर्थक वेळ वाया जात असतो. सकाळचा तो वेळ किती महत्वाचा आहे हे आपण लक्षातच घेत नाही. जितका वेळ आपण मोबाईल मध्ये घालवतो तितक्या वेळेत अनेक सकाळचे ‘नित्य कर्म’ होवू शकतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किमान दोन तास तरी मोबाईलला स्वतःपासून दूरच ठेवा. सकाळी उठल्या नंतर सर्वात आधी तुमचा बेड व्यवस्थित करा सकाळचे हे काम तुम्हाला सबकॉन्शियस रित्या दिवसभर सकारात्मक ठेवण्यास मदत कारेल.

तुमच्या रोजच्या उठण्याच्या वेळेस थोडा बदल करा म्हणजेच जर तुम्ही ७ वाजता उठत असाल तर साडे सहाला उठा किंवा ८ वाजता उठत असाल तर साडे सात वाजता उठा याचा फायदा तुम्हाला संपूर्ण दिवसभर होईल. सकाळ चा अर्धा तास नित्य नियमाने व्यायामाला द्या, सकाळी चालायला जा यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण योग्य रित्या होईल.
त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ता ! सकाळचा नाश्ता हा अवश्य करा. तो तुमच्यासाठी दिवसभर स्फुर्ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सकाळचा नाश्ता हा अजिबात घाई घाईत करू नका त्यासाठी किमान २० मिनिटे वेगळे काढून ठेवा. नाश्ता झाल्या नंतर तुम्ही वृत्तपत्र चाळू शकता. नंतर तुमचा मोबाईल तुम्ही हातात घ्या. त्यावेळी तुमच्या असे लक्षात येईल की बहुतेक नोटिफिकेशन हे फार काही महत्वाचे नाहीत.
अश्या प्रकारे जर तुम्ही दिवसाची सुरवात कराल तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल.