
बऱ्याच संघर्षानंतर बॉलिवूडच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या अशा अनेक कलाकारांच्या जीवनाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. कधी उपाशी राहून त्यांना जगावं लागलं, तर कधी रस्त्यावरच जगणं भाग पडलं. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत जे तोंडात चांदीच्या चमचा घेऊन जन्माला आले. आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊ जे अत्यंत श्रीमंत कुटुंबातून आले आहेत.
अरुणोदय सिंह
जिस्म २, मोहन जोदड़ो, ब्लॅकमेल आणि सिकंदर यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा अभिनेता अरुणोदय सिंग बॉलिवूडमध्ये काही वेगळी ओळख निर्माण करू शकला नाही पण तो नेहमी राजेशाहीमुळे चर्चेत राहतो. अरुणोदयचे आजोबा अर्जुन सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. त्याचे वडील अजय सिंह हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
अदिती राव हैदरी
अभिनेत्री अदिती राव हैदरी राजा-महाराजाच्या कुटूंबातील आहेत. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे १८६९ ते १९४१ पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान राहिले आहेत. तसेच अदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरीची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल राहिले आहेत. अदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वरा राव यांनी तेलंगणात वनपर्थीवर राज्य केले आणि अदितीची आजी शांता रामेश्वर राव हे हैदराबादच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञासमवेत ओरिएंट ब्लैकस्वान पब्लिशिंग हाउसच्या अध्यक्षा होत्या.
सैफ अली खान
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा ‘पटौदीचा नवाब’ आहे. वडील नवाब मोहम्मद मन्सूर अली खान सिद्दीकी पटौदी यांच्यानंतर हा वारसा त्याला मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सैफ भोपाळमधील पतौडी कुटुंबाची सुमारे ५००० कोटींची संपत्ती आहे. याखेरीज गुरुग्राम, दिल्ली आणि मुंबईमध्ये सैफची बरीच मालमत्ता आहे. मात्र, अलीशान आयुष्य ऐवजी सैफ सामान्य आयुष्य जगतो.
रणवीर सिंग
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच वर्चस्व गाजवत असतो. त्याची अनोखी शैली त्याला इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठेवते. रणवीरच्या संघर्षाबद्दल तुम्ही बर्याच कथा वाचल्या असतील, पण सत्य हे आहे की तो श्रीमंत घराण्यातून आला आहे. रणवीर सिंगचे वडील जगजीत सिंह हे एक महान आणि सुप्रसिद्ध रिअल स्टेट बिझिनेसमॅन आहेत.
रितेश देशमुख
रितेश देशमुखचा जन्म या बॉलिवूड स्टार्सप्रमाणे राजघराण्यात झाला आहे. त्याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याचा भाऊ एक राजकारणी आहे. रितेश राजकारणापासून दूर राहिला असला तरी तो अजूनही आपल्या कुटूंबियांसह राजगृहात (शाही घर) राहतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला