भारताकडून एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० पदार्पण सामन्यात ‘या’ फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या

टीम इंडियाकडून पदार्पण कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शिखर धवन आहे.

Kl Rahul-Shikhar Dhawan-Ajinkya Rahane

शिखर धवन, के. एल. राहुल आणि अजिंक्य रहाणे- अशी टीम इंडियाची सुप्रसिद्ध नावे आहेत. तिन्ही जणांचे आतापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे आणि हा प्रवास अजूनही चालू आहे. शिखर धवन  भारतीय संघात   सलामीवीर आहे तर के. एल. राहुल विकेटकीपर-फलंदाज आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार आहे; पण तो वनडे आणि टी-२० कमी खेळत आहे. तिघांनीही बर्‍याच वेळेस संघासाठी अनेक उपयुक्त डाव खेळले असून या तिघांच्या नावे एक अद्भुत विक्रम नोंदविला गेला आहे.

भारतासाठी बऱ्याच खेळाडूंनी क्रिकेटच्या तीन स्वरूपात म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात पदार्पण केले होते; परंतु या तिन्हीमध्ये पहिल्याच सामन्यात सर्वाधिक धावा मिळवण्याच्या दृष्टीने या तिन्ही खेळाडूंनी हा खेळ जिंकला आहे. कसोटी क्रिकेटविषयी बोलताना शिखर धवनने क्रिकेटच्या या स्वरूपातील पहिल्या सामन्यात १८७ धावा केल्या होत्या.

ही बातमी पण वाचा : “तुम्ही तीन धावा देऊच कसे शकता?” धोनी चिडला होता विराट आणि रोहित शर्मावर

भारतासाठी धवनच्या आधी किंवा नंतर कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सर्व खेळाडूंमध्ये कोणीही इतक्या धावा करू शकला नाही. हा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे. के. एल. राहुलने भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी करत आपल्या नावावर एक अद्भुत विक्रम नोंदविला होता.

भारताच्या बाजूने पदार्पण सामन्यात शतक झळकावणारा किंवा डेब्यू वनडेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर रहाणे हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रहाणेने पहिल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६१ धावा केल्या होत्या आणि
आतापर्यंत टी -२० मध्ये पदार्पण सामन्यात इतर कोणत्याही फलंदाजाने यापेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. भारताकडून

एकदिवसीय, कसोटी आणि टी -२० पदार्पण सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :

  • कसोटी सामना – शिखर धवन – १८७ धावा
  • एकदिवसीय सामना – के. एल. राहुल – १००  धावा
  • टी -२० सामना – अजिंक्य रहाणे – ६१ धावा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER