हे कलाकारही होते डिप्रेशनचे शिकार

These artists were also victims of depression

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांचे पगार कमी करण्यात आलेले आहेत. महागाई वाढत आहे. त्यामुळे कसे जगायचे असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकला आहे. या अशा अडचणींमुळे अनेक जण डिप्रेशनमध्ये (Depression) गेले आहेत. या डिप्रेशनमधून बाहेर येणे अवघड नाही. फक्त मनावर ताबा हवा. कोणत्याही कारणास्तव डिप्रेशनमध्ये जाऊन वेडेवाकडे पाऊल उचलण्याअगोदर या कलाकारांकडे आपल्याला पहावे लागेल. पैसा, मानमरातब, लोकप्रियता असली तरी या कलाकारांनाही डिप्रेशनने ग्रासले होते. मात्र या कलाकारांनी डिप्रेशनवर मात केली आणि पुन्हा एकदा भरारी मारत लोकप्रियतेचे शिखर गाठले.

amitabhयात सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल अमिताभ बच्चन यांचे. बॉलिवुडचा या सुपरस्टारने अधिक पैसे कमवण्याच्या उद्देश्याने एबीसीएल कंपनीची स्थापना केली. केवळ चित्रपट निर्मितीच नव्हे तर इव्हेंट अँरेंज करण्यापासून ऑडियो कॅसेट तयार करण्यापर्यंतचे व्यवसाय अमिताभ बच्चन (Amithab Bachchan) यांनी सुरु केले. परंतु माहितगार सल्लागार नसल्याने कंपनीने हाती घेतलेले सर्व प्रोजेक्ट फसले आणि कंपनीवर कोट्यावधींचे कर्ज झाले. कर्ज चुकवण्यासाठी घर विकण्याची पाळीही त्यांच्यावर आली होती. त्यातच ते अभिनय करीत असलेले चित्रपटही फ्लॉप होऊ लागले होे. सोबतीला आजारपणही होते. पडद्यावरी हा अँग्री यंग मॅन डिप्रेशनमध्ये गेला. एवढेच नव्हे तर शारीरिक आणि मानसिकरित्याही तो खचला होता. परंतु त्यांनी हार मानली नाही. पुन्हा उठून उभे राहिले आणि आपले पूर्वीचे वैभव मिळवले. आज बच्चन कुटुंबिय हजारों कोटींचे मालक आहेत. अर्थात यात अमिताभ बच्चन यांचे फिनिक्ससारखे भरारी घेणे हे महत्वाचे कारण आहे.

बॉलिवुडमध्ये ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्रही (Dhanmendra) डिप्रेशनचे शिकार झाले होते. सुरुवातीला dharmendra bobbyकाही चित्रपट हिट झाले. पण नंतर त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला होता. काही प्रेमप्रकरणांचाही त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ 15 वर्षे धर्मेंद्र डिप्रेशनमध्ये होते. याच काळात ते जास्त दारु प्यायला लागले होते. त्याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम होऊ लागला होता. परंतु लवकरच ते यातून बाहेर आले आणि पुन्हा एकदा काम करू लागले.

पिता धर्मेंद्रप्रमाणे बॉबी देओलही (Bobby Deol) डिप्रेशनमध्ये गेला होता. एक तर त्याचे चित्रपट पिता धर्मेेंद्र किंवा भाऊ सनीप्रमाणे हिट होत नव्हते. चित्रपट फ्लॉप होत असल्याने त्याला कोणी साईनही करीत नव्हते. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेला बॉबीही दारुच्या आहारी गेला होता. परंतु जेव्हा त्याची मुले आणि त्याची आई त्याच्याकडे रागाने पाहू लागली तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि तो काम मागण्यास बाहेर पडला. स्वतः बॉबीनेच गेल्या महिन्यात हे सांगितले होते.

srk anushkaशाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवुडचा बादशाह म्हटले जाते. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखनेही स्वतःची रेड चिली कंपनी स्थापन करून चित्रपट निर्मिती सुरु केली. परंतु त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्यातच त्याच्या खांद्याचेही ऑपरेशन झाले होते. एकेकाळी यश पाहिलेला हा बादशाह यशासाठी झगडू लागला होता. खांद्याचे ऑपरेशन झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलो होतो असे स्वतः शाहरुखनचे एकदा बोलताना सांगितले होते. नायक तंदुरुस्त असावा लागतो मात्र माझ्या खांद्याचे काही खरे नव्हते. मात्र लवकरच मी यातून बाहेर आलो आणि पुन्हा काम करण्यास सुरुवात केली असेही त्याने स्पष्ट केले होते.

 

केवळ नायकच नव्हे तर नायिकाही डिप्रेशनच्या शिकार झालेल्या आहेत. दीपिका पदुकोन (Deepika Padukone) डिप्रेशनची शिकार होती. आणि तिने तिचे डिप्रेशन लपवूनही ठेवले नव्हते. चित्रपट यशस्वी होत असले तरी खाजगी जीवनात दीपिकाला अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागले होते. याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला होता. याबाबत बोलताना दीपिकाने म्हटले होते, मी काय करावे हेच मला कळत नव्हते. कुठे जाण्याची, कोणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. मी सतत रडत राहात असे. पण लवकरच मला जाणवले की असे रडत राहाण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मी पुन्हा उभी राहिली आणि स्वतःला कामात गुंगवून घेतले. दीपिकाने डिप्रेशन आलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक एनजीओही स्थापन केली आहे.

दीपिकाप्रमाणेच अनुष्का शर्माही (Anushka Sharma) डिप्रेशनची शिकार झाली होती. शाहरुखबरोबर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असला तरी अनुष्काला म्हणावे तसे चित्रपट मिळाले नाहीत. काम मिळत नसल्याने अनुष्का डिप्रेशनमध्ये गेली होती. अनुष्का म्हणते, डिप्रेशन येतेच परंतु याचा अर्थ असा नाही की लगेच वेडेवाकडे पाऊल उचलले पाहिजे. पोट दुखल्यावर जसे आपण डॉक्टरकडे जातो तसेच यासाठीही डॉक्टरकडे गेले पाहिजे. अनुष्काने तिला एंग्जायटी डिसॉर्डर असल्याचे आणि त्यावर उपचार सुरु असल्याचेही सांगितले होते.

Who is Manisha Koirala Dating Now - Husbands & Biography (2020)मनीषा कोइरालाला (Manisha Koirala) जेव्हा गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे समजले. तेव्हा तीसुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. परंतु कुटुंबाने आणि मित्रांनी तिला धीर दिला. तिचे मनोबल वाढवले आणि तिला केवळ डिप्रेशनमधूनच बाहेर काढले असे नव्हे तर कॅन्सरवर मात करण्यास तिला मानसिकरित्या तयारही केले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER