एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा लग्न केले या कलाकारांनी

Actors

बॉलिवुडमध्ये किती वेळा प्रेम करावे आणि किती वेळा लग्न करावे याबाबत कोणताही नियम नाही आणि असेल तर तिकडे कोणी लक्ष देत नाही. बॉलिवुडमधील काही कलाकारांनी एकदा, दोनदा नव्हे तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे. तीन वेळा लग्न करणाऱ्या कलाकारांची माहिती आज आपण या लेखातून घेऊया.

प्रख्यात गायक, निर्माता, संगीतकार, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक किशोर कुमारने (Kishore Kumar) आपल्या आयुष्यात तीन नव्हे तर चार वेळा लग्न केले आहे. किशोर कुमारचे पहिले लग्न रुमा देवी यांच्यासोबत झाले होते. मात्र हे लग्न आठ वर्षच टिकले. रूमा देवी यांच्यानंतर किशोर कुमारने मधुबालासोबत लग्न केले. आजारी मधुबालाची किशोर कुमारने खूप सेवा केली परंतु दुर्दैवाने मधुबालाचे निधन झाले. त्यानंतर किशोर कुमारने योगिता बालीशी लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही. योगिता बालीचे मिथुन चक्रवर्तीबरोबर प्रेम जुळल्याने या दोघांनी घटस्फोट घेतला. याच दरम्यान किशोर कुमारचे लीना चंदावरकरसोबत सूत जुळले. योगिता बालीशी घटस्फोट घेतल्यानंतर किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांनी लग्न केले.

किशोर कुमारप्रमाणे कबीर बेदीनेही (Kabir Bedi) चार लग्न केलेली आहेत. कबीर बेदीचे पहिले लग्न बंगाली नृत्यांगना प्रोतिमा बेदीसोबत झाले. या दोघांना पूजा नावाची एक मुलगी आहे. मात्र काही कारणांमुळे या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कबीर बेदीने ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसानबरोबर लग्न केले. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर कबीर बेदीने तिसरे लग्न टीव्ही मालिका निर्मात्री निक्कीसोबत लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही. आणि आता वयाच्या 71 व्या वर्षी कबीर बेदी यांनी त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री परवीन दुसांजबरोबर  चौथे लग्न केले आहे.

सध्या फुफ्फुसाच्या आजाराने असलेल्या संजय दत्तनेही (Sanjay Dutt) तीन वेळा लग्न केले आहे. संजय दत्तने मॉडेल रिचा शर्मासोबत पहिले लग्न केले. या दोघांना त्रिशाला नावाची एक मुलगीही झाली. ब्रेन ट्यूमरमुळे रिचाचे निधन झाले. त्यानंतर मुलगी त्रिशाला परदेशातच राहू लागली होती. रिचाचे निधन झाल्यानंतर संजय दत्तने मॉडेल रिहा पिल्लईशी लग्न केले. संजय दत्तबरोबर लग्न करण्यापूर्वी रिहाने अमेरिकन नागरिक मायकेल वाजसोबत लग्न केले होते. परंतु फार काळ त्यांचे लग्न टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला होता. संजय दत्तबरोबरचेही लग्न फार काळ टिकले नाही. या दोघांनी 2005 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर रिहा पिल्लईने लिएंडर पेससोबत लिव्ह इन मध्ये राहाण्यास सुरुवात केली. या दोघांना एक मुलगीही आहे. रिहाने लिएंडरवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. रिहानंतर संजय दत्तने मान्यतासोबत लग्न केले. या दोघांना मुलगा-मुलगी असे एक जुळे आहे.

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रानेही तीन लग्ने केलेली आहेत. विधुने पहिले लग्न त्याच्या चित्रपटाची एडिटर रेणू सलुजाशी लग्न केले. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. दोघेही वेगळे झाले. त्यानंतर विधुने लगेचच शबनम सुखदेवशी लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही. 1990 मध्ये विधु चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्राच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांनी लग्न केले.

कमल हसननेही (Kamal Hassan) आतापर्यंत तीन लग्ने केलेली आहेत. कमलने पहिले लग्न 1978 मध्ये शास्त्रीय गायिका वाणी गणपतीसोबत लग्न केले. परंतु दहा वर्षाच्या संसारानंतर हे दोघेही वेगळे झाले. यानंतर कमल हसनने बॉलिवुडची अभिनेत्री सारिकाशी लग्न केले. या दोघांना श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली आहेत. मात्र काही वर्षानंतर सारिकाने कमल हसनसोबत घटस्फोट घेतला आणि एकटीच राहू लागली. यानंतर कमल हसन अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. काही जणांचे म्हणणे आहे की या दोघांनी लग्न केले आहे. परंतु या दोघांनी अधिकृतपणे आपल्या लग्नाची घोषणा केलेली नाही.

विशेष म्हणजे तीन वेळा लग्न करणाऱ्या कलाकारांमध्ये फक्त एकच स्त्री कलाकार आहे आणि ती म्हणजे नीलिमा अझीम. समांतर सिनेमातील अभिनेत्री असलेल्या नीलिमाने सर्वप्रथम प्रख्यात अभिनेता पंकज कपूरसोबत लग्न केले. या दोघांना शाहीद नावाचा मुलगा आहे. शाहीद कपूर सध्या बॉलिवुडमधील आघाडीचा नायक आहे. शाहीद 3 वर्षांचा असताना नीलिमाने  पंकज कपूरसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलिमाने अभिनेता राजेश खट्टरसोबत लग्न केले. त्यांना इशान नावाचा मुलगा असून त्यानेसुद्धा करण जोहरच्या धडकमधून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या नायकाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. आता त्याचा अनन्या पांडेसोबत खाली पिली नावाचा चित्रपट येत आहे. राजेश खट्टरशी घटस्फोट घेतल्यानंतर नीलिमाने आपला लहानपणीचा मित्र उस्ताद रझा अली खानशी लग्न केले आहे. या यादीत बिपाशा बसुचा पति करण सिंह ग्रोव्हर आणि विद्या बालनचा पति सिद्धार्थ रॉय कपूर यांचेही नाव येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER