या कलाकारांचेही आहेत डुप्लिकेट

Bollywood Stars With Duplicate

काल आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai Bachchan) जुळी बहिण शोभेल अशा पाकिस्तानमधील एका मुलीची माहिती दिली होती. तिचे फोटो पाहून अनेक जण तिला प्रथमदर्शनी ऐश्वर्या रायच समजले होते. इतके ती हुबेहुब ऐश्वर्याप्रमाणे दिसत होती. काही जणांनी तर तिने ऐश्वर्यासारखे दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचाही आरोप केला होता. केवळ हीच नव्हे तर 2005 मध्ये ‘लकी: नो टाइम फॉर लव’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर आलेली स्नेहा उलालही (Sneha Ullal) ऐश्वर्या रायसारखीच दिसत होती. पण बॉलिवूडमध्ये केवळ ऐश्वर्या रायच अशी अभिनेत्री नाही जिच्यासारखे दिसणारे दुसरे कोणी तरी आहे. तर बॉलिवूडमध्ये अजूनही असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे डुप्लिकेट या जगात आणि मुंबईतही आहेत. आज आपण अशाच कलाकार आणि त्यांच्या डुप्लिकेटची माहिती या लेखातून घेऊया.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) तिच्यासारखीच दिसणाऱ्या अमांडा सेर्नीसोबत (Amanda Cerny) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळेच चकित झाले होते. जॅकलीनचीच दोन रुपे दिसत होती. पण जॅकलीनने या पोस्टसोबत त्या दुसऱ्या अभिनेत्रीचे नाव दिल्याने ती तिच्यासारखीच दिसणारी अभिनेत्री आहे हे समजले. जॅकलीनसारखी दिसणारी ही अमेरिकन अभिनेत्री असून तिचे नाव अमांडा सर्नी असे आहे. 2017 मध्ये जॅकलीन सर्वप्रथम अमांडाला भेटली होती. आणि तिला पाहाताच तिला आश्चर्यही वाटले होते. कारण ती सेम टू सेम जॅकलीनसारखी दिसत होती. त्यानंतर या दोघींनी अनेक फोटो एकत्र काढले होते जे सोशल मीडियावर नंतर जॅकलीनने शेअर केले होते.

हृतिक रोशन (Hrithik Roshan) बॉलिवूडचा सुपरहीरो आहे. त्याला ग्रीक गॉड म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते तसेच जगातील सगळ्यात हँडसम नायकांमध्येही त्याचा समावेश केलेला आहे. अशा या हृतिक रोशनशी मिळता जुळता चेहरा असलेला एक अभिनेता बॉलिवूडमध्येही असून त्याचे नाव आहे हरमन बावेजा. (Harman Baveja) हा तोच हरमन बावेजा आहे जो कधी काळी प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड होता. केवळ हरमनच नव्हे तर अमेरिकन अभिनेता ब्रॅडली कूपरही सेम टू सेम हृतिक रोशनसारखा दिसतो.

हरमन बावेजा जसा हृतिकसारखा दिसतो त्याचप्रमाणे त्याची एकेकाळची प्रेयसी प्रियांका चोप्राचीही (Priyanka Chopra) डुप्लिकेट आहे. प्रियांकाची ही डुप्लिकेट आहे पाकिस्तानची प्रख्यात मॉडेल आणि अभिनेत्री झाले सरहदी. (Zale Sarhadi) झाले सरहदी सोशल मीडिया वर खूपच लोकप्रिय आहे. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. जाले ने जेव्हा करिअरला सुरुवात केली होती तेव्हा ती पूर्णपणे प्रियांका चोप्रासारखीच दिसत होती.

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माची (Anushka Sharma) डुप्लिकेटही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनुष्कासारख्या दिसणारी ही एक पाश्चात्य गायिका असून तिचे नाव ज्यूलिया मायकल्स (Julia Michaels) आहे. ज्यूलिया हुबेहूब अनुष्का शर्मासारखी दिसते. दोघींच्या केसांचा रंग वेगळा असल्याने त्यांच्या फरक करणे सोपे जाते.

सोशल मीडियामुळे अशा अनेक डुप्लिकेटचा शोध लागलेला आहे. बॉलिवुडमध्ये सध्या आलिया भट्टने (Alia Bhatt) स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले असून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत सगळ्यांना अभिनयाची कमाल दाखवली आहे. आता ती लवकरच संजय लीला भंसाळीच्या गंगुबाई काठियावाडमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याच आलियाची डुप्लिकेट काही दिवसांपूर्वी एका व्हीडियोमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. व्हीडियोतील ही मुलगी हुबेहूब आलियासारखी दिसत होती. आलियाच्या ‘गली बॉय’ सिनेमातील लुक या मुलीने घेतला होता. तो लुक पाहून ती आलियाच आहे असे वाटत होते. या मुलीचे नाव सनया (Sanaya) असून ती उत्तराखंडमध्ये राहाते.

दिया मिर्झाने (Dia Mirza) 2001 मध्ये फरदीन खानसोबत रहना है तेरे दिल में सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर अनेक सिनेमात दिया दिसली होती. आता काही दिवसांपूर्वीच दियाने दुसरे लग्न केले. अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका अॅने हॅथवे (Anne Hathaway) याच दिया मिर्झासारखी दिसते. या दोघींचे एकत्र फोटो पाहिल्यास या दोघींमध्ये फरक करणे कठिण जाते.

बॉलिवुडमधील शॉटगन उर्फ शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सेम टू सेम तरुण रीना रॉय (Reena Roy) सारखी दिसते.

याशिवाय बॉलिवूडमध्ये देव आनंद, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, सैफ अली खान, अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारेही अनेक जण आहेत. या डुप्लिकेटपैकी काही जणांना तर सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली होती. सैफ अली खानचा डुप्लिकेट पेट्रोल पंपावर काम करणारा आहे तर अनिल कपूरचा डुप्लिकेट वांद्रे येथील जी 7 या मल्टीप्लेक्समध्ये डोअर कीपरचे काम करतो. या डुप्लिकेट्सना पाहून त्या-त्या कलाकारांचे फॅन्स त्यांच्या आवडीच्या कलाकाराला पाहिल्याचे समाधान मिळवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER