‘या’ तीन राशीचे व्यक्ती असतात आपले दुःख लपविण्यात एक्सपर्ट

hide the grief

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण १२ राशी आहेत. ज्या व्यक्तींचा स्वभाव दर्शवतात. या राशींवरून दुःखात किंवा टेन्शनमध्ये कोण कसे वागतात किंवा काय करू शकतात, हे देखील समजून घेण्यास मदत होते. जाणून घेऊयात अशा तीन राशीच्या व्यक्तींबाबत जे दुःखी असूनही आपलं दुःख व्यक्त करत नाहीत अथवा ते समोरच्या व्यक्तील जाणवूही देत नाहीत.

cancer

कर्क राशी (Cancer) :-  कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वात इमोशनल समजलं जातं. कुटुंब आणि त्यांची सुख, दुःख यांना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते. मग त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अत्यंत इमोशनल असले तरीही या राशीची लोकं आपलं दुःख चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. जोपर्यंत या व्यक्तींना अशी एखादी व्यक्ती मिळत नाही जी त्यांना समजून घेईल तोपर्यंत ही लोकंआपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नाहीत.

virgo

कन्या राशी (Virgo) :- कन्या राशीच्या व्यक्ती आनंदी आहेत, दुःखी आहेत की, एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहेत. कोणतेच इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. कन्या राशीच्या लोकांना समजूतदार समजलं जातं. त्यामुळे या लोकांना सतत भिती वाटत असते की, जर यांनी आपलं दुःख कोणाला सांगितलं तर कोणी त्यांच्या या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेता कामा नये. त्यांच्या गोष्टींची कोणी मस्करी करणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न त्यांना खात असतात. त्य़ामुळे ते आपल्या गोष्टी कोणासोबतही शेअर करत नाहीत.

वृश्चिक राशि (Scorpio) :- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना फार रहस्यमयी समजलं जातं. यांचं मित्रपरिवार फार मोठा असतो. पण तरीसुद्धा ते आपल्या समस्या कोणालाही सांगत नाहीत. जर तुमच्या एखाद्या मित्राची रास वृश्चिक असेल तर तुम्हालाही अनेकदा जाणवलं असेल की, या व्यक्ती कोणाशीही आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करत नाहीत. ते तुमच्या अडचणींवर तुम्हाला अनेक उपाय सांगतिल, तुमची साथही देतील, पण स्वतःची कोणतीही गोष्ट ते तुम्हाला सांगणार नाहीत.