गेल्या दहा वर्षातील हे आहेत सगळ्यात वाईट चित्रपट

Sadak 2

महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी त्यांच्या गाजलेल्या सडक चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे सडक 2 या महिन्यात घेऊन आले. सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवुडमध्ये नेपोटिझमची चर्चा सुरु झाली आणि याचा मोठा फटका आलिया भट्टला (Alia Bhatt) बसला. सडकच्या टीझरपासूनच देशातील नागरिकांनी डिसलाईकचा विक्रम करण्यास सुरुवात केली होती. केवळ टीझरच नव्हे तर चित्रपट जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला तेव्हाही चित्रपटाने सगळ्यात कमी रेटिंगचा विक्रम केला. आयएमडीबीवर केवळ एक अंक या चित्रपटाला देण्यात आला तर अनेक चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटाला अर्धा ते एकच स्टार दिला. यावरून हा चित्रपट किती वाईट आहे याची कल्पना येते.

आता लवकर चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता दिसत नाही आणि नवे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे या वर्षातील हा सगळ्यात वाईट चित्रपट म्हणता येईल. गेल्या दहा वर्षात असे अनेक चित्रपट आहेत जे अत्यंत वाईट चित्रपट म्हणून ओळखले जात आहेत. या चित्रपटांना समीक्षकांनी अत्यंत कमी रेटिंग दिले होते. चित्रपटांसाठी रॉटन टोमॅटो रेटिंग देते. विशेष म्हणजे टोमॅटोमीटरचे रेटिंग पाहून प्रेक्षक चित्रपट पाहायचा की नाही ते ठरवतात. टोमॅटोमीटर हा फक्त हॉलीवुडच्या चित्रपटासाठी रेटिंग देत नाही तर बॉलिवुडच्या चित्रपटासाठीही देतो. रॉटन म्हणजे अत्यंत वाईट चित्रपट तर फ्रेश म्हणजे चांगला चित्रपट असे समजले जाते. फ्रेशसाठी 90 टक्क्यांच्या वर रेटिंग दिले जाते.

या रेटिंगच्या आधारावरच आम्ही तुम्हाला गेल्या एका दशकातील अत्यंत वाईट चित्रपटाची माहिती देत आहोत. गेल्या सनी देओल, इरफान खानचा ब्लॅन्कल चित्रपट प्रदर्शित झाला होता. टोमॅटोमीटर ने या चित्रपटावा 0 टक्के रेटिंग दिले होते. तर सोनाक्षी सिन्हाच्या खानदानी शफाखानालाही टोमॅटोमीटर ने 0 टक्केच रेटिंग दिले होते. 2018 मध्ये यशराज आणि आमिर खानचा बहुचर्चित ठग्ज ऑफ हिंदुस्तान प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका होती. हा चित्रपट तिकीट खिडकीवर विक्रमी कमाई करेल असे म्हटले जात होते. परंतु चित्रपट सुपर फ्लॉप झाला. टोमॅटोमीटर ने या चित्रपटाला 21 टक्के रेटिंग दिले होते.

याच वर्षी सलमान खानचा रेस 3 प्रदर्शित झाला होता. मोठे स्टार्स असलेल्या या चित्रपटाला टोमॅटोमीटरने 8 टक्के रेटिंग दिले होते. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या यशराजच्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या जब हॅरी मेट सेजलला टोमॅटोमीटर ने 10 टक्के रेटिंग दिले होते. 2017 मध्येच प्रदर्शित झालेल्या अमिताभच्या सरकार 3 ला टोमॅटोमीटरने 13 टक्के रेटिंग दिले होते. 2017 मध्ये अजय देवगन, विद्युत जमवाल, इमरान हाशमीचा बादशाहो प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तर टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते. 2016 मध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूर अभिनीत की अँड का प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर कोसळलेल्या या चित्रपटाला टोमॅटोमीटर ने 11 टक्के रेटिंग दिले होते. 2015 मध्ये आलिया भट्ट आणि शाहीद कपूरचा शानदार चित्रपट प्रदर्शित झाला होता. टोमॅटोमीटर ने या चित्रपटाला 10 टक्के रेटिंग दिले होते. 2015 मध्येच इमरान हाशमी, विद्या बालन अभिनीत हमारी अधूरी कहानीला टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय दत्त. इमरान हाशमी आणि कंगना रनौत अभिनीत उंगली चित्रपटाला टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते. 2014 मध्ये आलेल्या सैफ अली खान, रितेश देशमुख, तमन्ना भाटिया, इशा गुप्ता अभिनीत हमशक्लला टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते. 2013 मध्ये रेस 2 प्रदर्शित झाला होता. सैफ अली, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोन अभिनीत या चित्रपटाला टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते. 2013 मध्येच अक्षयकुमारचा बॉस चित्रपटही प्रदर्शित झाला होता. टोमॅटोमीटर ने या चित्रपटाला 0 टक्के रेटिंग दिले होते. 2013 मध्येच आलेल्या शाहीद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाच्या आर राजकुमारला टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते.

2012 मध्ये अक्षय कुमारचा खिलाडी प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला असला तरी टोमॅटोमीटर ने 0 टक्के रेटिंग दिले होते. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा दिग्दर्शित अजय देवगन, कॅटरीना आणि रणबीर कपूर अभिनीत राजनीती चित्रपटाला टोमॅटोमीटर ने 13 टक्के रेटिंग दिले होते. 2010 मध्ये अक्षय कुमार आणि कॅटरीना अभिनीत फरहा खान दिग्दर्शित तीस मार खानला टोमॅटोमीटर ने 11 टक्के रेटिंग दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER