गेल्या दशकात बॉलिवुडमध्ये कमाईचा विक्रम केलेले हे आहेत दहा चित्रपट

Bajrangi Bhaijaan - PK

बॉलिवुडमध्ये (Bollywood) वर्षाला दीडशे तो दोनशे सिनेमे प्रदर्शित होतात. परंतु यापैकी मोजकेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट होतात. गेल्या दशकात म्हणजे 2010 पासून आतापर्यंत 1800 ते 2000 हिंदी सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. परंतु यापैकी फारच कमी सिनेमांनी कोट्यावधींच्या उड्या मारलेल्या आहेत. यावर्षी कोरोनामुळे जवळ जवळ नऊ महिने थिएटर बंद असल्याने सिनेमे प्रदर्शित होऊ शकले नाहीत. पहिल्या तीन महिन्यात 45 च्या आसपास सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र यापैकी फक्त अजय देवगणच्या तान्हाजीनेच 362 कोटींचा व्यवसाय करून यावर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवून दशकातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या तिसरा क्रमांक पटकावला आहे. दहा सिनेमांमध्ये सलमानच्या तीन आणि आमिरच्या दोन सिनेमांचा समावेश आहे.

कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे बाहुबली 2. मूळ दक्षिण भारतीय भाषेतील एस. एस. राजामौली दिग्दर्शित आणि प्रभास अभिनीत या चित्रपटाचा पहिला भाग बाहुबली बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता. त्यामुळे बाहुबली 2 बाबत जेव्हा घोषणा झाली तेव्हा त्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी बाहुबली 2 ला प्रचंड गर्दी केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर 550 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम केला.

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो आमिर खानचा दंगल. दंगलमध्ये आमिर खानने एका अशा पैलवानाची भूमिका साकारली होती ज्यात तो आपल्या मुलींना कुस्ती खेळण्यासाठी तयार करतो. मुलीही कुस्ती शिकतात आणि विश्व स्तरावर पुरस्कार मिळवून देशाचे नाव रोशन करतात. फोगट बहिणींच्या जीवनावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 375 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

तिसऱ्या क्रमांकावर यावर्षी प्रदर्शित झालेला तान्हाजी- अनसंग वॉरियर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या तान्हाजीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते तर तान्हाजीची भूमिका अजय देवगणने साकारली होती. प्रेक्षकांना तान्हाजी प्रचंड आवडला आणि त्याने बॉक्स ऑफिस वर 367 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कोरोनामुळे थिएटर

चौथ्या क्रमांकावर आहे सलमान खानचा टायगर सीरीजमधील गुप्तहेरपट ‘टायगर जिंदा है’. सलमान खानने टायगर बनत पुन्हा एकदा एका मोठ्या मोहिमेला हात घालत ती पूर्ण केल्याचे या सिनेमात दाखवण्यात आले होते. पहिल्या टायगरप्रमाणेच या सिनेमातही कॅटरीना कैफने सलमानच्या गुप्तहेर पत्नीची भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. सलमान खानच्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा आणि भव्य चित्रपट होता.

पाचव्या क्रमांकावर आहे राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमिर खान, अनुष्का शर्मा अभिनीत सिनेमा पीके. धार्मिक गोष्टींवर प्रहार केल्याने हा सिनेमा वादात सापडला होता. परंतु अनेक हिंदू संघटनांनी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. तरीही हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनीही या सिनेमाला डोक्यावर घेतले आणि बॉक्स ऑफिसवर 337 कोटी रुपयांचा व्यवसाय करून दिला.

सहाव्या क्रमांकावरही राजकुमार हिरानीचाच सिनेमा आहे आणि तो म्हणजे ‘संजू’ संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. राजकुमार हिरानीने अत्यंत मनोरंजक पद्धतीने संजय दत्तचे जीवन पडद्यावर मांडले होते. ते पाहाण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 334 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या एका छोट्या मुक्या मुलीला पुन्हा पाकिस्तानात सोडण्याची जबाबदारी हनुमान भक्त असलेल्या सलमान खानने स्वीकारली आणि बजरंगी भाईजान ने त्या मुलीला पुन्हा पाकिस्तानात नेऊन सोडले. भारत-पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये दुश्मनीऐवजी प्रेम निर्माण व्हावे असा संदेश देणारा हा बजरंगी भाईजान प्रेक्षकांना प्रचंड आवडला. सातव्या क्रमांकावर असलेल्या या सिनेमाने 315 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

आठव्या क्रमांकावर पुन्हा एकदा सलमानचाच सिनेमा आला आहे. आमिरप्रमाणेच सलमाननेही पैलवानाची भूमिका साकरलेला हा सिनेमा आहे सुलतान. सलमान आणि अनुष्का शर्मा अभिनीत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा व्यवसाय केला होता.

नवव्या क्रमांकावर आहे यशराज फिल्म्सचा ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत सिनेमा वॉर. ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही अॅक्शन हीरो असून प्रथमच ते एकत्र येत असल्याने त्यांच्या अॅक्शनची जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी केली होती. या सिनेमाने 297 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

दहाव्या क्रमांकावर आहे संजय लीला भंसालीचा पद्मावत. पद्मावती राणीच्या जीवनावर आधारित या सिनेमाचे नाव अगोदर पद्मावती असेच होते. परंतु राजस्थानी प्रेक्षकांनी विरोध केल्याने सिनेमाचे नाव पद्मावत ठेवण्यात आले. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह अभिनीत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 282 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER