मुंबईकरांवर हे आहेत निर्बंध

महापालिकेची घोषणा

These are the restrictions on Mumbaikars

मुंबई-विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम आदींमध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी असेल, यापेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये, असे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

सर्व चित्रपट, गृहनाट्यगृहं, उपहारगृह आणि खाजगी कार्यालये यांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना परवानगी असेल. समारंभ/कार्यक्रम, खाजगी कार्यालये आदी ठिकाणी या मर्यादांचे उल्लंघन केलेले आढळून आले आणि त्याठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे आढळले, तर संबंधित व्यक्तींना दंड आकारण्यात येईल तसेच संबंधित आस्थापने व्यवस्थापन यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका आयुक्त इचाल सिंह (Iqbal Chahal) चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सोमवारी एका विशेष आढावा वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड संशयितांची वैद्यकीय तपासणी, तपासणी अहवाल, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन, विलगीकरण विषयक बाबी, जम्बो कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुम, सील्ड इमारती इत्यादी कोविडशी संबंधित विविध विषयांवर कोविड नियंत्रणाच्या दृष्टीने सविस्तर
चर्चा करण्यात आली,

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तिना कोविड सबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांकडून आवर्जून करवून घ्यावयाची आहे. सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचनांनुसार कोविड बाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे प्रथम मुंबई महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे.

बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे चाचणी केल्यापासून २४ तासांच्या आत मुंबई महानगरपालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर देखील तात्काळ अपलोड करणे बंधनकारक आहे. कोविड खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने व सुव्यवस्थित करावे. हे नियोजन करताना आय.सी.यू, खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुध्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

लक्षणे नसलेल्यांना तात्काळ क्वारंटाईन करावे

ज्या व्यक्तिना कोविड बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे पण, ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा लक्षणे नसणा-या रुग्णांचे गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण तात्काळ करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून अशा रुग्णांपासून इतरांना कोविड बाधा होणार नाही.

क्वारंटाईन असताना बाहेर पडल्यास एफआयआर

गृह विलगीकरणात असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे. असे रुग्ण सार्वजनिक परिसरात किंवा घराच्याबाहेर वावरताना आढळल्यास त्यांच्याविरोधात’एफआयआर दाखल करावा.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इक्चाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सोमवारी एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड संशयितांची वैद्यकीय तपासणी, तपासणी अहवाल, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन, विलगीकरण विषयक बाबी, जम्बो कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुम, सील्ड इमारती इत्यादी कोविडशी संबंधित विविध विषयांवर कोविड नियंत्रणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील ज्या व्यक्तिना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांकडून आवर्जून करवून घ्यावयाची आहे. सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचनांनुसार कोविड बाधितांच्या वैद्यकीय चाचणींचे अहवाल हे प्रथम मुंबई महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे. तसेच बाधित व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास, अशा प्रकरणी चाचणी अहवाल महानगरपालिकेसह संबंधित रुग्णालयास कळविण्याची सवलत पूर्वीप्रमाणेच कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER