हे आहेत खरे जमिनीशी जुळलेले मुख्यमंत्री! घोटाळ्यावरून भातखळकरांचा टोमणा

atul bhatkhalkar-CM Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक (Anvay Naik) कुटुबांतील जमीन व्यवहाराबाबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी गौप्यस्फोट केला. या जमीन व्यवहारात मनीषा रवींद्र वायकर यांचेही नाव सोमय्या यांनी घेतले. यावरून भाजपाचे नेते आ. अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला – हे आहेत खरे जमिनीशी जुळलेले मुख्यमंत्री!

भातखळकर यांनी ट्विट केले – भावांनो समजून घ्या. मुख्यमंत्री जमीन खरेदीत खूपच व्यस्त असल्यामुळे राज्यातल्या समस्या हाताळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नसावा. फक्त अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत २१ व्यवहार झालेत. खरंच ते जमिनीशी जुळलेले  मुख्यमंत्री आहेत!

ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्यांनी केले आरोप ; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले? रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णव  गोस्वामींना लक्ष्य करत आहात का? असा आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर केला होता.

किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट केली होती. “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत. ” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER