ह्या आहेत जुन्या चित्रपटांमधील बोल्ड अभिनेत्री, आजही प्रथम क्रमांकावर मंदाकिनी यांचे नाव आहे

Actors

बॉलिवूड अभिनेत्रींचे फिल्मी करिअर खूपच लहान असते. कालांतराने, सुंदर चेहरे असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रींचे रूप देखील बदलतात. पण त्यांनी केलेले पात्र आजही आठवतात. हिंदी सिनेमात अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या काळात बोल्ड पात्रे साकारली आहेत, जाणून घेऊया अश्या अभिनेत्रींबद्दल …

सिमी ग्रेवाल-‘मेरा नाम जोकर’

राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात ऋषी कपूर यांनी राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये एक देखावा होता ज्यामध्ये शिक्षिका कपडे बदलत आहेत आणि ऋषी कपूर ते दृश्य गुप्तपणे पहात आहे. या शिक्षिकेची भूमिका सिमी यांनी केली होती.

वैजयंती माला-‘संगम’

राज कपूर यांच्या ‘संगम’ या चित्रपटात वैजयंती माला बोल्ड स्टाईलमध्ये दिसल्या होत्या. वैजयंती मालाने प्रथमच या चित्रपटात बिकिनी परिधान केल्या. पाण्याखालील हा देखावा खूप प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडक दिली होती.

जीनत अमान-‘सत्यम शिवम् सुदंरम’

१९७८ साली आलेला राज कपूर यांचा ‘सत्यम शिवम सुदंरम’ हा चित्रपटही खूप बोल्ड होता. या चित्रपटात जीनत अमान यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोल्ड कपडे परिधान केले आणि बोल्ड देखावेही दिले. विशेष म्हणजे शशी कपूरसोबत जीनत अमान यांनी चित्रित केलेला टायटल ट्रॅक चर्चेत राहिला. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये जीनत आणि शशी कपूर यांनी बरेच अंतरंग (intimate) दृष्य दिले.

मंदाकिनी- ‘राम तेरी गंगा मैली’

मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून प्रवेश केला होता. मंदाकिनीने या चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन दिले होते, विशेषत: धबधब्याखालील देखावा. या सीनमध्ये मंदाकिनीने फक्त पांढरी साडी घातली होती ज्यामध्ये तीला धबधब्याखाली उभे राहयचे होते. या सीनसाठी मंदाकिनीला अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER