हे आहेत बॉलिवूडमधील सिंगल पिता

single father in bollywood

पति किंवा पत्नीने एकट्याने मुलांना सांभाळणे सोपे नसते. घटस्फोटानंतर मुले कधी आईकडे तर कधी वडिलांकडे असतात. मात्र मुलांचे यात खूप हाल होतात. तर कधी कधी पति किंवा पत्नीचे निधन झाले की मुलांचा सांभाळ उरलेल्या एकाला करावा लागतो आणि त्यासाठी आई आणि वडिल अशी दोन्ही रुपे घेऊन दोघांचेही प्रेम मुलांना द्यावे लागते. काही जण मात्र लग्नाच्या बेडीत न अडकता पालकत्वाची इच्छा बाळगतात आणि मुलांना सरोगसी म्हणा वा दत्तक मार्गाने मुलांना घरी आणतात. स्त्रीला मातृत्वाची आस असल्याने अनेक काही नायिकांनी लग्न न करता मुली दत्तक घेतल्याची उदाहरणे आहेत. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार निर्माते आहेत ज्यांनी लग्न न करता पालकत्वाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सरोगसीद्वारे मुलांना घरी आणले. आणि या मुलांना आईचेही प्रेम देत आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव. त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वमम देव देवः..’ या श्लोकानुसार मुलांचा सांभाऴ हे सिंगल पिता करीत आहेत.

जीतेंद्र बॉलिवूडमधील एक यशस्वी नायक. अनेक सुपरहिट चित्रपट जितेंद्रने दिलेले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तुषार कपूरही (Tushar Kapoor) नायक म्हणून पडद्यावर आला पण तो काही चालला नाही. त्याची बहिण एकता कपूर नेही तुषारसाठी चित्रपटांची निर्मिती केली पण तुषारचे करिअर काही आकार घेऊ शकले नाही. याच तुषारने लग्नही केले नाही आणि एक मुलगा दत्तक घेऊन त्याचे पालनपोषण करीत आहे. मुलाचे नाव त्याने लक्ष्य ठेवले असून त्याच्या पालनपोषणात त्याने स्वतःला गुंतवून ठेवले आहे. तो प्रचंड खुश आहे. मुलाला तो आई आणि वडिल दोघांचेही प्रेम देत आहे. लग्न न करता एकटे राहून मुलांचा सांभाळ करण्याची सुरुवात बॉलिवूडमध्ये सर्वप्रथम तुषार कपूरनेच केली आहे.

प्रख्यात निर्माता दिग्दर्शक करण जोहरनेही (Karan Johar) लग्न न करता एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघांना सरोगसीच्या माध्यमातून घरी आणले आहे. मुलाचे नाव त्याने यश ठेवले असून मुलीचे नाव रुही ठेवले आहे. दोन्ही नावे त्याने आपल्या आईवडिलांच्या नावावर ठेवली आहेत. करण या दोन मुलांचा सांभाऴ अत्यंत मनापासून करीत असून त्यांच्यासाठी तो वेळही काढत असतो. जेव्हा शूटिंग सुरु होती तेव्हा तो त्यांना सेटवरही घेऊन जायचा. आता लॉकडाऊनमध्ये तर तो संपूर्ण वेळ या मुलांसोबतच काढत आहे.

तुषार कपूर आणि करण जोहरने सरोगसीद्वारे मुले घेतली. मात्र राहुल देवने (Rahul Dev) पत्नीच्या निधनानंतर दुसरे लग्न न करता आपल्या मुलाचा एकट्याने सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि तो मुलाचा सांभाळ अत्यंत उत्कृष्टपणे करीत आहे.राहुलची पत्नी रीना अनेक वर्ष कँसरने पीडित होती. 2009 मध्ये रीनाचे निधन झाले. तेव्हा त्यांचा मुलगा सिद्धार्थ लहान होता. मुलाचे संगोपन नीट व्हावे आणि त्याला सावत्र आईचा त्रास होऊ नये म्हणून पडद्यावरील या खलनायकाने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि मुलाचे संगोपन करणे सुरु केले. राहुलने सिद्धार्थला आई आणि वडिलांचे प्रेम दिले आणि वाढवले आहे.

राहुल बोसचाही (Rahul Bose) लग्नावर तसा विश्वास नाही. राहुल म्हणतो लग्न म्हणजे सगळ्यात अनसेटल्ड गोष्ट आहे. त्यामुळेच त्याने लग्न केले नाही. तो म्हणतो लग्न न करता मी चांगल्या प्रकारे सेटल झालो आहे. आता लग्न करून अनसेटल व्हायचे नाही. अभिनेता असलेला राहुल बोस सामाजिक कार्यांमध्येही भाग घेतो. राहुलने एक दोन नव्हे तर सहा मुलांना दत्तक घेतले आहे. विशेष म्हणजे ही मुले अंदमान निकोबार येथील आहेत. या मुलांचा सांभाळ राहुल बोस एकट्याने करतो. या मुलांना तो आई आणि वडिल असे दोघांचे प्रेम देत आहे.

मल हसननेही आपल्या दोन मुलींचा श्रृती आणि अक्षराचा एकहाती सांभाळ केलेला आहे. प्रख्यात अभिनेत्री सारिका बरोबर कमल हसन अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहात होता. मात्र काही वर्षानंतर हे दोघे एकत्र झाले. तेव्हा दोन्ही मुली कमल हसनकडेच राहिल्या. कमलने आपल्या चित्रपटांच्या शेड्यूलमधून वेळ काढून दोन्ही मुलींचा सांभाळ केला. त्यांना चांगले शिक्षण दिले. आज श्रृती तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमधली एक आघाडीची नायिका झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER