हे आहेत बॉलिवूडमधील एकमेकांचे चेहरेही न पाहाणारे कलाकार

बॉलिवूडमच्या सिनेमांमध्ये (Bollywood News) मैत्रीची गाथा मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते. दोन मित्रांपैकी कधी एक हिंदू असतो तर दुसरा मुस्लिम असतो. कधी दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकणारे असतात तर कधी एकाच एरियात राहाणारे वा एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करणारे पण असतातच. सिनेमातील मित्र एकमेकांसाठी प्राणांची आहुती देण्यासही तयार असलेले आपण अनेकदा पाहिले आहे. अशा सिनेमांची यादी करायला बसलो की शेकड्याने असे सिनेमे आठवतील. सिनेमात मैत्रीची महती सांगणारे काही कलाकार वास्तव जीवनात मात्र एकमेकांचे इतके दुश्मन असतात की, एकमेकांचे चेहरे पाहाण्यासही तयार नसतात. एखाद्या कार्यक्रमात असे दोन शत्रू एकत्र आले की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्टपणे दिसून येतात. बरं हे फक्त अभिनेतेच असतात असे नाही तर अनेक दिग्दर्शक आणि डांस डायरेक्टरही असे वागताना दिसतात. यांच्या दुश्मनीमागील कारणही व्यावसायिक असते. बॉलिवुडमधील अशाच काही दुश्मन जोड्यांवर एक नजर-

करण जोहर (Karan Johar) आणि रामगोपाल वर्मातील (Ramgopal Verma) दुश्मनी सगळ्यांनाच ठाऊक आहे. करण जोहरचा ‘कभी अलविदा ना कहना‘ सिनेमा आला होता. करणच्या स्टाईलप्रमाणे हासुद्धा एक मल्टीस्टारर कौटुंबिक मसाला सिनेमा होता. रामगोपाल वर्माने या सिनेमाला भितीदायक सिनेमा असे म्हटले आणि तेव्हापासून या दोघांमध्ये दुश्मनी सुरु झाली. यानंतर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या सिनेमावर टीका करीत आणि मनातील मळमळ बाहेर काढत असत. तेव्हापासून सुरु झालेले त्यांचे हे युद्ध अजूनही सुरु आहे.

अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि रणवीर सिंहही (Ranveer Singh) एकमेकांचा चेहराही पाहात नाहीत. या दोघांनी गुंडे सिनेमात एकमेकांच्या घट्ट मित्रांची भूमिका साकारली होती. खरे तर रणवीर तेव्हा दीपिकाशी डेटिंग करीत होता. पण त्या काळातच अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण काही जवळ आले होते. रणवीरला ही गोष्ट आवडली नव्हती आणि त्याने तसा मेसेजही अर्जुन कपूरला पाठवला होता. त्यानंतर हे दोघे आजवर कधीही एकत्र आलेले नाहीत आणि एकमेकांशी बोलतही नाहीत.

रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि रणबीर कपूरमधील (Ranbir Kapoor) दुश्मनीही जगजाहिर आहे. याची सुरुवात रणबीर कपूरने आयोजित केलेल्या एका पार्टीमधून झाली होती. या पार्टीत रणबीर कपूर खूप दारू प्याला होता. त्याला आपण काय करतोय हेसुद्धा कळत नव्हते. पार्टीला आलेल्या दीपिका पदुकोणचा अपमान रणबीर कपूर करू लागला. तेव्हा रणवीर सिंहने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच या दोघांमधील मैत्री संपुष्टात आली. वाचकांना कदाचित ठाऊक असेल की सुरुवातीला दीपिका आणि रणबीर कपूर लव्ह बर्ड्स होते. पण रणबीरने दीपिकाला धोका दिला होता. दीपिका अजूनही ही गोष्ट विसरलेली नाही.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खानही (Aamir Khan) एकमेकांचे दुश्मन आहेत. जरी ते सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे दाखवत असले तरी तसे नाही. या दोघांमध्ये दुश्मनीची ठिणगी 1996 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सिने पुरस्कार सोहोळ्यात पडली होती. या पुरस्कार सोहोळ्यात शाहरुख खानला ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ सिनेमातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. खरे तर त्या वर्षी आमिर खानचा ‘रंगीला’ही स्पर्धेत होता. आमिरला पुरस्कार मिळणार असे म्हटले जात होते पण पुरस्कार गेला शाहरुखला. शाहरुखने पुरस्कार कसा मिळवला याच्या अनेक कथा आहेत. त्या कथांमुळेच आमिर खान शाहरुखवर नाराज झाला आणि त्यामुळेच हे दोघे कधीही एकत्र आले नाहीत.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्यातून विस्तवही जात नाही. या दोघींमध्ये दुश्मनी ‘ऐतराज’ सिनेमापासून सुरु झाली होती. या दोघींच्याही या सिनेमात मुख्य भूमिका होत्या, पण प्रियांकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तेव्हापासून करीना प्रियांकाला पाण्यात पाहात आली आहे. नंतर शाहरुख खानच्या ‘डॉन’मध्येही दोघी एकत्र आल्या. पण तेव्हाही प्रियांकाने करीनावर मात केल्याने करीनाच्या रागाचा पारा चढला आणि त्यानंतर तिने प्रियांकाचे तोंडही पाहणे बंद केले.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि कॅटरीना कैफमध्ये (Katrina Kaif) रणबीर कपूरवरून दुश्मनी झाली होती जी आजही कायम आहे. दीपिका आणि रणबीर डेटिंग करीत होते. त्याच काळात कॅटरीना कैफ रणबीरच्या जवळ आली होती. रणबीर दिपिकापासून केवळ कॅटरीनामुळेच दूर गेला होता. या दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंवर दीपिकाने अत्यंत कटु टीका केली होती. त्यामुळे कॅटरीना आणि दीपिकामध्ये विस्तवही जात नाही.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) कधी काळी एकमेकांचे चांगले मित्र होते. परंतु नंतर या दोघांच्या मैत्रीत अंतर पडले. आणि याचे कारण होते ऋतिकला मिळालेले यश. अभिषेक अमिताभचा मुलगा तर ऋतिक राकेश रोशनचा मुलगा. अमिताभचा करिश्मा असल्याने अभिषेक सुपरस्टार होईल असे म्हटले जात असे. ऋतिक रोशन इतका पुढे जाईल असे तेव्हा कोणालाही वाटले नव्हते. पण जेव्हा ऋतिक रोशन यशस्वी स्टार झाला तेव्हा अभिषेक मात्र मागे पडत होता. आणि आजही तीच स्थिती आहे. ऋतिकचे हे यशच अभिषेकला त्याच्यापासून दूर घेऊन गेले. हे दोघे आज जरी समोरासमोर आले तरी एकमेकांशी बोलत नाहीत.

याशिवाय बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय- राणी मुखर्जी, सनी लियोनी- राखी सावंत, ईशा देओल-अमृता राव यांच्यासह अजूनही अशी अनेक नावे आहेत ज्यांच्यात मैत्री नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER