९० च्या दशकात या अभिनेत्यांच्या फॅशनचा होत असे विनोद, आता लुक्सच्या बाबतीत आजच्या अक्टर्सना देतात स्पर्धा

90' s heros

बॉलिवूडमध्ये (Bollywood) ९० चे दशक असे होते त्या काळात एकापेक्षा अधिक प्रयोग करण्यात आले. यात लूक्स ते स्टाईल बदलण्याचा प्रयत्न केला गेला. त्या काळातली अभिनेत्यांची फॅशन पाहिल्यावर हसू येईल. पण त्यावेळी त्यांची चर्चा रंगली होती. तथापि, जेव्हा काळ बदलला आहे तेव्हा त्या कलाकारांच्या व्यक्तिमत्त्व आणि फॅशन स्टाईलमध्ये देखील प्रचंड बदल झाला आहे. किंवा असे म्हणता येईल की वाढत्या वयानं त्यांना आणखी सुंदर बनवलं आहे.

सुनील शेट्टीला भारताचे अर्नोल्ड श्वार्जनेगर म्हटले जाते. वयाच्या ५९ व्या वर्षीही सुनील खूप फिट आहे. तो ९० च्या दशकाचा सर्वात लोकप्रिय हिट स्टार होता, तथापि फॅशनच्या बाबतीत त्याचे फारसे कौतुक झाले नाही. त्यावेळी बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये तो ढिला पँट, ओपन शर्ट आणि विखुरलेल्या केसांसह दिसत होता. पण आता सुनील शेट्टीचा फॅशन आलेखही (Fashion Graph) वाढला आहे. इतकेच नाही तर वय वाढत असूनही सुनील इंटेन्स वर्कआउट सोडत नाही. त्याला तासन्तास जिममध्ये घाम काढायला खूप आवडते.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारने ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्याच्या पहिल्याच चित्रपटात त्याला बरीच दाद मिळाली पण प्रेक्षकांना त्याची स्टाईल आवडली नाही. तथापि, काळाबरोबर त्याने आपल्या तंदुरुस्तीकडे तसेच कपड्यांकडेही लक्ष द्यायला सुरवात केली. याचा परिणाम म्हणून आता अक्षय आपल्या स्टाईल स्टेटमेंटद्वारे तरुणांनाही प्रेरित (Inspire) करतो.

गेल्या दोन दशकांत अजय देवगन बॉलिवूडचा सिंघम बनला आहे. चित्रपटात त्याची उपस्थिती चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी पुरेसे आहे. यापूर्वी अजय देवगणवर त्याच्या लूकसाठी टीका केली जात होती, आता त्याचे कौतुक होत आहे. ९० च्या दशकात अजय देवगणची जादू अशी होती की प्रत्येक चित्रपटा नंतर तो एक मोठा स्टार बनला. त्याचबरोबर, ९० च्या दशकापासून अजय देवगनच्या लूकमध्येही बरेच बदल झाले आहेत. वाढत्या वयानुसार, अजयने त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे जी त्याच्या फोटोंमध्येही दिसते.

सदाहरित अभिनेता अनिल कपूर हे बॉलिवूडचा नायक आहे ज्यांच्यावर वाढत्या वयाचा काही परिणाम होत नाही असे दिसते. वयाच्या ६४ व्या वर्षीही त्यांच्याकडे यंगस्टर्ससारखी उर्जा आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम आणि मुलगा यशवर्धन यांनीही चित्रपटांमध्ये डेब्यू केला आहे, पण अनिल यांची ऊर्जा अद्याप अबाधित आहे. आज अनिल कदाचित सुपरस्टार असेल, पण एक काळ असा होता की जेव्हा त्यांच्याकडे पैसे कमी होते आणि राहण्यासाठी घरही नव्हते. तथापि, ९० च्या दशकाचे जवान अनिल कपूर आणि ६४ वर्षांचे अनिल कपूर यांच्यातील किती फरक आहे या फोटोंमधून तुम्ही अंदाज लावू शकता. असं म्हणता येईल की वाढत्या वयात अनिल सुपर स्टायलिश झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER