‘हे’ ४ सामने जेव्हा टीम इंडियाने सर्वांना केले चकित, केवळ १ धावांनी मिळविला विजय

Team India

क्रिकेट (cricket) हा अनिश्चिततेचा खेळ आहे जिथे एक धाव आणि एक चेंडू महत्त्वाचा असतो. थोड्या फरकाने जिंकण्यासाठीही संघाला कठोर परिश्रम करावा लागतो.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. तसे तर क्रिकेटच्या या स्वरुपात जगातल्या बर्‍याच दिग्गजांनी झेंडे फडकावले आहे आणि या स्वरुपात अनेक संघांनी ऐतिहासिक विजय नोंदवले आहेत. पण जर आपण एका संघाबद्दल बोललो तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कुठेही सामना नाही आहे. अनेक वेळा टीम इंडियाने वन डेमध्ये अवघ्या १ धावांनी विजय मिळविला आहे. म्हणूनच आजच्या या कथेत आम्ही तुम्हाला अशा ४ प्रसंगांविषयी सांगत आहोत जिथे वनडेमध्ये भारताने अवघ्या १ धावांनी विजय मिळवला आहे.

#१. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand)

१९९० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाने वेलिंग्टन येथे रॉथमैंस चषक तिरंगी मालिकेच्या चौथ्या सामन्यात पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात १ धावांनी विजय मिळवला होता. या ४९ षटकांच्या सामन्यात भारताने २२१ धावा केल्या होत्या, त्यास उत्तर म्हणून न्यूझीलंडचा संघ २२० धावांवर बाद झाला होता. या सामन्यात कपिल देवने ४६ धावा फटकावल्या आणि २ गडीही बाद केले होते, त्यानिमित्ताने त्याला ‘सामनावीर’ ही पदवीही दिली होती.

#२. भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka)

१९९३ मध्ये टीम इंडिया आपल्या श्रीलंकेच्या दौर्‍यावर होता. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला १ धावांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने २१२ धावा केल्या होत्या, त्यानंतर श्रीलंकाचा संघ ४९.२ षटकांत २११ धावा करुन बाद झाला. या सामन्यात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ५३ धावा केले होते आणि त्याच्या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले होते.

#३. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)

२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर आला होता, जिथे जयपूर येथे ३ सामन्यांच्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि २९८/९ अशी धावसंख्या उभी केली, त्यास उत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ २९७ धावांवर ऑलआऊट झाला होता. या सामन्यात भारताने १ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात रवींद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते.

#४. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)

२०११ मध्ये भारताने पुन्हा दक्षिण आफ्रिकेला १ धावांनी पराभूत केले होते. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्याचा दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला होता आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका १८९ धावा करुन बाद झाली. या सामन्यात मुनाफ पटेलला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल ‘सामनावीर’ ही पदवी देण्यात आली होती.

ही बातमी पण वाचा : गैरी कर्स्टन यांनी उघड केले, सांगितले- कश्यामुळे बनले विश्वचषक जिंकणारा भारतीय…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER