म्हणून गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता !

Dhananjay Munde-Gopinath Munde

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचं नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे. अनेक मोठ्या घराण्यातल्या नात्यांचा राजकीय महत्त्वकांक्षेनं बळी घेतला. अशा परिस्थतीचा पवारांनी सतत फायदा घेतला असल्याचा आरोप अनेकदा त्यांचे विरोधक करत असतात. उदाहरणादाखल धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांच्यात पवारांच्या सांगण्यावरुन अजित पवारांनी फुट पाडल्याच्या चर्च्या कानावर येतच असातात. गोपिनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांच्या सातव्या पुण्यतिथीला धनंजय मुंडेंनी केलेल्या भावनिक ट्वीटमुळं धनंजय मुंडेंच्या मनात गोपिनाथ मुंडेंबद्दलच्या भावाना स्पष्ट झाल्या आहेत.

मराठवाड्यातल्या प्रभावी राजकारण्यांपैकी दोन नेते हे एकाच घरातले. बीडचे मुंडे काका पुतण्या. आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा ७ वा स्मृतीदिन. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतांना उजाळा देण्यात येतोय. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. केंद्र सरकारनं गोपीनाथ मुंडेंना आदरांजली देताना त्यांच्या नावाचं पोस्टल तिकीट आज प्रकाशित केलं. आजच्या दिवशी सर्वात जास्त लक्ष वेधलं ते गोपीनाथराव मुंडेंच्या तालमीत तयार झालेले, राज्याचे समाज्यकल्याण मंत्री ‘धनंजय मुंडे’ यांनी. त्यांनी भावनिक ट्वीट करत गोपीनाथरावांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे.

धनंजय मुंडे यांनी मंत्रालय परिसरातील कार्यालयात मुंडेंच्या प्रतिमेला हार घारुन धनंजय मुंडे यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ट्वीट करत कृतज्ञाता पुर्वक विनम्र अभिवादन करत असल्याचं ते म्हणाले, धनंजय मुंडेंनी ट्वीट केलं की, “अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो.” अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंडे घराण्यात फाटाफुट

महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रमुख राजकीय घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे मुंडे घराणं. बीडच्या नाथ्रा गावात सामान्य ऊसतोड मजूराच्या पोटी जन्मलेल्या गोपीनाथरावांनी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली. ९५ ला युतीचं सरकार आलं तेव्हा त्यांच्याकडे गृहखातं आणि उपमुख्यमंत्रीपद होतं. मुंबईला अंडरवर्ल्डपासून मुक्त करण्याचा वीडा त्यांनी उचलाला आणि ते करुन ही दाखवलं. मुंडेचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात वाढत होता. त्यामुळं त्यांचा वारसा मिळेल. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला स्थान मिळेल या विचारानं धनंजय मुंडे स्वतःला तयार करत होते.

वक्तृत्व आणि नेतृत्तव या दोन्ही बाबतीत धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून तयार होत होते. मुंडेंचा राजकीय वारसा कुणाला मिळणार याचे अंदाज बांधले जात होते. तो काळ होता २००९च्या लोकसभा निवडणूकीचा. या निवडणूकी दरम्यानच धनंजय मुंडे दुखावले गेले होते.

पंकजांच्या राजकीय एंट्रीमुळं धनंजय मुंडेंची भाजपातून एक्झीट

२००९ लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. १ लाख ४० हजार मतांनी गोपीनाथराव मुंडे लोकसभेवर निवडूण गेले. नंतर सहा- सात महिन्यात विधानसभा निवडणूक होती. याच निवडणूकीत स्पष्ट होणार होतं गोपीनाथ मुंडेचा राजकीय वारसा कुणाला मिळणार? पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सारं चित्र स्पष्ट झालं. गोपीनाथराव मुंडे यांचे जेष्ठ बंधू पंडीराव मुंडे यांचे चिरंजीव, मुंडेचे सख्खे पुतणे धनंजय मुंडे यात नाराज झाले. गोपीनाथराव मुंडेंचा राजकिय वारसा स्वतःला मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र या निर्णयामुळं ते नाराज झाले. त्यांची नाराजी दुर करण्यासाठी त्यांनी विधानपरिषद देण्यात आली.

वाद इथंच मिटला नाही. पंकजा विरुद्ध धनंजय छुपा संघर्ष सुरुच होता. अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची नाराजी हेरली आणि त्यांना छुपा पाठिंबा द्यायला सुरुवात केली. परिणामतः २०१२ ला धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्याविरुद्ध बंड करत परळीचा नगराध्यक्ष निवडूण आणला. स्वतःच्याच गोटातील सभापती परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आणला. यानंतर चित्र स्पष्ट होतं. धनंजय मुंडे फक्त नाममात्र भाजपात होते. धनंजय मुंडेंच्या वडीलांनी आधीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर २०१३ ला धनंजय मुंडेंनी भाजपच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला. पुढं विधानपरिषद निवडणूक लागली. प्रचंड चुरशीच्या या निवडणूकीत धनंजय मुंडे विजयी झाले. नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button