म्हणूऩ अक्षय-डिंपलची जोडी जमली नाही

Dimple-Kapadia-Akshay-Kumar-gay.jpg

अक्षय कुमारने (Akshay Kumar) डिंपलची (Dimple Kapadia) मुलगी ट्विंकलसोबत (Twinkle) लग्न केल्याने ती त्याची सासू झाली आहे. परंतु काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया एका चित्रपटात काम करणार होते. विशेष म्हणजे या चित्रपटात या दोघांवर एक अत्यंत रोमँटिक गाणेही चित्रित केले जाणार होते. परंतु ती गोष्ट जुळून आली नाही आणि भविष्यात सासू बनणाऱ्या डिंपलसोबत काम करण्याची अक्षयकुमारची संधी हुकली.

नव्वदच्या दशकात अक्षयचे खिलाडी सीरीजमधील चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले होते. यापैकीच एक चित्रपट होता 1996 मध्ये आलेला ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’. उमेश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर प्रचंड यश मिळवले होते. यात अक्षयची नायिका होती रवीना टंडन. तर रेखाने एक अत्यंत महत्वाची खलनायकी भूमिका साकारली होती. या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूएफमधील प्रख्यात ‘द अंडरटेकर’ (ब्रायन ली) आणि अक्षयची मारामारीही होती. या मारामारीचे प्रचंड प्रमोशन करण्यात आले होते.

अक्षय आणि रविनाचे प्रेम प्रकरण तेव्हा सुरु असल्याने या दोघांची जोडी जमवण्यात आली होती. खलनायिकेच्या भूमिकेसाठी एक चांगल्या अभिनेत्रीचा शोध उमेश मेहरा घेत होते. त्यांनी डिंपल कपाडियाची निवड केली. डिंपलला भूमिकाही आवडली होती. ‘इन द नाइट नो कंट्रोल’ बोल असलेले रोमँटिक हॉट गाणेही या दोघांवर चित्रित केले जाणार होते. परंतु जेव्हा तारखांबाबत बोलणी सुरु झाली तेव्हा मात्र डिंपल दुसऱ्या चित्रपटात बिझी असल्याने ती वेळ देऊ शकली नाही. त्यामुळे उमेश मेहरा यांनी रेखाला या भूमिकेसाठी निवडले. रेखानेही ही भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली होती. मात्र डेट्समुळे डिंपल आणि अक्षय एकत्र येण्यापासून वंचित राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER