नाराजी तर होणारच; ती दूर करू : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

औरंगाबाद :- राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होतोच. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल सोमवारी येथे सांगितले.

पदवीधर निवडणुकीनिमित्ताने औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. प्रीतम मुंडे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. संभाजी निलंगेकर, हरिभाऊ बागडे, उमेदवार शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये आदी उपस्थित होते. मागील वेळी चांगली लढत दिलेल्या बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघात भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे. या निवडणुकीत प्रवीण घुगे, किशोर शितोळे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, रमेश पोकळे इच्छुक होते. मात्र, बोराळकर यांचे नाव निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियावर बहुजनांवर अन्याय होत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता, कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

घुगे अथवा पोकळे यांना उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज आहेत का, असे विचारले असता आ. पाटील यांनी, किशोर शितोळे हेदेखील इच्छुक होते. सामूहिक निर्णय करताना हे होणारच. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत. कारखाना कामामुळे त्या उपस्थित नसल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER