आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका

मुंबई :- समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कोरोनाच्या (Corona) लसीतही भाजपा-मोदी विरोधाचे राजकारण शोधले! म्हणालेत, आमचा भाजपावर (BJP) विश्वास नाही. … भाजपाकडून देण्याच येणारी कोरोनावरील लस घेणार नाही!

यावर भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अखिलेश (Akhilesh Yadav) यांचा समाचार घेतला. राणे यांनी ट्विट केले, काय म्हणणार अशा माणसांना जे औषधांमध्येही पक्ष शोधतात. प्रत्येक आजारावर लस येईल. पण आजारी मानसिकतेवर कधीच औषध येणार नाही आणि जोपर्यंत ही आजारी मानसिकता भारतातून जात नाही तो पर्यंत आपल्या देशाचं काही खसे नाही.

ही बातमी पण वाचा : भाजपाची सत्ता असताना नामांतराचा प्रस्ताव का नाही पाठवला? राम कदमांच्या प्रश्न

कोरोनाच्या लसीबाबत अखिलेश यादव यांनी ट्विट केले होते, “जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे? टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.”

अखिलेश यादव यांनी भाजपावर खोटी आश्वासने दिल्याचाही आरोप केला. “गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते. उत्तर प्रदेश सरकारने एवढी खोटी आश्वासने दिली आहेत की, आपण कल्पानाच करू शकणार नाही,” असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER