
नागपूर :- कोरोनाने (Corona Virus) पुन्हा युटर्न घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा असे सक्तीचे आवाहन नागरिकांना केले आहे. तर नागपुरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन नागपुरात लॉकडाऊन नाही मात्र, कडक निर्बंध असतील असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले आहे.
मास्क न घालणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे नितीन राऊत म्हणाले. तसेच येत्या ७ मार्च पर्यंत आठवडी बाजार बंद राहील असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात (Nagpur) पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, नागपुरात १ मार्च ते १५ मार्च कडक लॉकडाऊन राहील असे सुतोवाच कोणीतरी केले होते आणि सर्वत्र अशी अफवा पसरली. मात्र, सरसकट लॉकडाून न करता काही निर्ंबध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
ही बातमी पण वाचा : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा जनतेला अल्टिमेटम
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला