‘देशात तिसरी आणि चौथीही लाट येणार, सज्ज राहा !’ नितीन गडकरींचे आवाहन

Nitin Gadkari

नागपूर :- महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने होरपळत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केले आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

“कोरोनाविरुद्धच्या या कठीण लढाईला एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे. आधीच दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू.” असे गडकरी म्हणाले.

मृत्यूचे थैमान
तर दुसरीकडे कोरोना मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक होता. त्यामुळे वाढत्या रुग्णांसोबत मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी एकाच वेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button