‘दृश्यम 2’चाही हिंदी रिमेक होणार

Drishyam-2

2013 मध्ये तामिळ भाषेत ‘दृश्यम’ (Drishyam)नावाचा सिनेमा आला होता. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एक केबल चालक आपल्या बुद्धीने काय काय करतो आणि कुटुंबाला कसा वाचवतो हे अत्यंत उत्कृष्टपणे दाखवले होते. या तामिळ सिनेमाचा दिग्दर्शक होता जीतू जोसेफ. (Jeethu Joseph) त्यानेच सिनेमाची कथाही लिहिली होती आणि सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती मोहनलालने (Mohanlal). हा सिनेमा तामिळमध्ये तर सुपरहिट झालाच. याचे अनेक भाषात रिमेकही करण्यात आले. या रिमेकमध्ये कमल हसनपासून अजय देवगणपर्यंत अनेक मोठ्या नायकांनी काम केले होते. विशेष म्हणजे विविध भाषातील ही रिमेकही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. मूळ दिग्दर्शक जीतू जोसेफने मोहनलालला घेऊन ‘दृश्यम 2’ तयार केला आणि शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला. प्रेक्षकांना हा सिनेमाही प्रचंड आवडला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा याचे रिमेक बनण्यास सुरुवात केली जाईल असे म्हटले जात होते. आणि हे खरेही ठरले आहे.

मूळ तामिळ ‘दृश्यम’च्या हिंदी रिमेकचे अधिकार कुमार मंगत (Kumar Mangat) यांनी घेतले होते आणि त्यांनी अजय देवगन (Ajay Devgan) आणि तब्बूला (Tabbu) घेऊन 2015 मध्ये ‘दृश्यम’ तयार केला होता. याचे दिग्दर्शन केले होते निशिकांत कामतने. (Nishikant Kamat). हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. याच कुमार मंगत यांनी आता ‘दृश्यम 2’ च्या हिंदी रिमेकचे अधिकार विकत घेतले आहेत. ‘दृश्यम 2’ मध्ये ‘दृश्यम’चा एंड जिथून झाला होता तेथूनच सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या सिनेमाप्रमाणेच दुसरा भागही प्रेक्षकांना खुर्चीला बांधून ठेवणारा झाला आहे. त्यामुळेच अजय देवगण आणि कुमार मंगत यांनी हिंदी रिमेकसाठी तगडी रक्कम मोजून अधिकार विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. अजय देवगण आणि कुमार मंगत संयुक्तरित्या या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. अजय देवगणच्या ‘दृश्यम’चे दिग्दर्शन करणारा निशिकांत कामत आता या जगात नसल्याने दुसऱ्या दिग्दर्शकाचा शोध सुरु करण्यात आला आहे. सिनेमात अजय देवगण आणि तब्बू दृश्यम सिनेमातील त्यांच्या भूमिका पुढे नेणार असून उर्वरित कलाकारांचीही लवकरच निवड केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी दिग्दर्शकाची निवड केली जाईल आणि त्यानंतरच पुढील काम सुरु केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असून पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER