सारा अलीला शाळेतून काढून टाकण्याची आली होती वेळ

Sara Ali Khan

लहानपणी सगळेच व्रात्य असतात. शाळेत खोड्या करण्यात सगळेच अग्रेसर असतात आणि त्यासाठी शाळेत शिक्षकांचा आणि घरी पालकांचा मार खाणे हे ठरलेलेच असते. सामान्य घरातील मुलांसाठी मार हा प्रकार असतो. मोठ्या घरातील मुलांना हात लावण्याची किंवा त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्याची हिम्मत कोणत्याही शिक्षकामध्ये नसते. आता तुम्ही म्हणाल, हे मध्येच काय? शिक्षक हा शिक्षक असतो आणि त्याच्यासाठी सर्व विद्यार्थीही सारखेच असतात. पण तो काळ गेला. आता आंतरराष्ट्रीय शाळा आणि त्यांची कोट्यावधींची फी असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या खोड्या माफ करतात. हे सारा अलीने स्वतःच सांगितलेल्या एका घटनेवरून सिद्ध झाले आहे.

सारा अली (Sara Ali Khan) ही सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी असून पतौडी या राज घराण्यातील ती आहे. त्यामुळेच तिचे शिक्षण हे उच्चभ्रूंसाठी असलेल्या शाळा आणि कॉलेजमध्येच झाले आहे. साराने मुंबईतील बेसेंट मॉन्टेसेरी स्कूल आणि धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले असून 2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले आहे. शाळेतील आठवणी सांगताना साराने सांगितले, शाळेमध्ये मी कधीही एका स्टारची मुलगी असल्यासारखे वागले नाही. मी खूप मस्ती करीत असे, खोड्या काढत असे. माझ्या एका खोडीमुळे तर मला शाळेतून काढण्यापर्यंत वेळ आली होती. माझे वडिल सैफ मला नेहमी अभ्यासावर लक्ष देण्यास सांगत आणि माझ्याकडून अभ्यासही करून घेत असत.

शाळेतून काढून टाकण्याच्या घटनेबाबत बोलताना साराने सांगितले, एकदा मला काय सुचले कोणास ठाऊक पण मी वर्गातील पंख्याच्या पात्यांवर गम पसरवून ठेवला. क्लास सुरु झाल्यावर पंखा सुरु करण्यात आला. पंखा सुरु करताच त्यावर मी पसरलेला गम सगळ्या वर्गात पसरला. मुलांच्या अंगावर तर पडलाच सगळ्या भिंतीही खराब झाल्या होत्या. माझ्या या खोडीमुळे शाळेच्या प्रिंसिपल खूपच नाराज झाल्या होत्या. मी असे का केले असा प्रश्न त्या मला सतत विचारत होत्या. पण माझ्याकडे काहीही उत्तर नसल्याने मी काहीही सांगू शकले नाही. पण अखेर त्यांनी मला माफ केले असेही साराने सांगितले.

ती केवळ सारा अली खान होती म्हणूनच प्रिंसिपलने तिला माफ केले यात शंका नाही. तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर तिला नक्कीच शिक्षा झाली असती. तुम्हाला काय वाटते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER