‘हात जोडण्यापलीकडे काही करु शकलो नाही, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

Uddhav Thackeray’s visit to Bhandara District Hospital

भंडारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात (Bhandara District Hospital) दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली. त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही, अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.(Uddhav Thackeray’s visit to Bhandara District Hospital)

पीडित कुटुंबियांचं सांत्वन करुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ही दुर्घटना आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. मी, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री येथे आलो आहोत. पीडित कुटुंबासमोर हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी केली जाईल. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल या घटनेला जो जबाबदार असेल तो सुटणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

तसंच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विभागीय आयुक्तांना त्याबाबत आदेश दिले आहेत. मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर राज्यात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ही अतिशय भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, जिथे ही घटना घडली त्या रुग्णालयाची मी आताच पाहणी केली, हे घडलं कशामुळे हे बघावं लागेल, आधी त्या विशिष्ट उपकरणाबाबत काही मागमी करण्यात आली होती का, कुठली तक्रार आली होती का?, हे पाहावं लागेल. या घटनेनंतर एक चौकशी तर झालीच पाहिजे, यामध्ये हा अपघात अचानक घडला आहे, की अहवाल आल्यानंतरही दुर्लक्ष झालं आहे हेही तपासलं जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

गेलं वर्षभर कोरोनाचा (Corona) सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का?, याची चौकशी करण्याचे आदेशमी काल दिले आहेत. संपूर्ण राज्यातील रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट हे लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेले आहेत. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये विभागीय आयुक्तांना जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे. कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात समिती बनविली आहे, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी त्यात असतील, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर अॅण्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका, आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER