मराठवाड्यात कलम ३७० नव्हते मग का विकास झाला नाही. – भालचंद्र कांगो

औरंगाबाद : मराठवाड्यात कलम ३७० नव्हते मग का विकास झाला नाही. सरकार भावनीक मुद्यावर राजकारण करत आहे त्यांना विकासाशी काही घेणे देणे नाही असा आराेप भालचंद्र कांगाे यांनी केला. ते भाकपाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदत बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मध्य विधानसभा मतदारसंघासह राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगनात उतरविले आहेत, या उमेदवारांना मतदारांनी या संबधीचा एक जाहीरनामा मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आला. ३६ सुत्री जाहीरनामा त्यांनी जाहीर केला.

भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते ह जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. याप्रसंगी भाकपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.मनोहर टाकसाळ, राज्य सचिव प्रा. राम बाहेती, युवकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष परमजितसिंग ढाबा, मध्यचे उमेदवार अभय टाकसाळे, जिल्हा सरचिटणीस अश्पाक सलामी, शहर सचिव मधुकर खिल्लारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ. कांगो म्हणाले, शेतकरी, शेत मजूर, कामगार आणि बेरोजगार युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात जनजागृती करून जनमत एकत्र करणे आणि आर्थिक प्रश्नाकडे गांभीर्याने न पहाता भावनिक उपस्थित करून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पराभूत करणे हे दोन उद्दिष्ट समोर ठेवून भाकप वाटचाल करीत आहे, यासाठी विधानसभा निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघासह राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगनात उतरविले आहेत. जनता कौल देईल असा आम्हाला विश्वास त्यांनी व्यक्त केला.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याचा डांगोरा पिटला जात आहे, अशी टीका करून डॉ. कांगो म्हणाले, मरा’वाड्यात कुलम ३७० कलम नव्हते मग विकास का झाला नाही, असा प्रतिप्रश्न करून ते म्हणाले, सरकारला विकासाचे काही देणे-घेणे नाही, भावनिक मुद्दे उपस्थित करून सत्ता हस्तगत करायची आहे, असाही आरोप त्यांनी केला.