फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, मुलाखतीसंदर्भात चर्चा झाल्याची राऊतांकडून कबुली

Sanjay Raut - Devendra Fadnavis

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजप (BJP) नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सतत टीका करता असतात. मात्र अशातच आज संजय राऊत यांनी आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये फडणवीसांसोबत जवळपास दोन तास चर्चा केली. दुपारचं जेवणही त्यांनी एकत्र घेतलं. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र आता खुद्द संजय राऊत यांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

मुळात आमची भेट गुप्त नव्हती. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट घेणे अपराध नाही. सामनात साध्य मुलाखतीचे सत्र सुरु आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुलाखत घेण्यात आली. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे सामनासाठी त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी ही भेट झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER