सचिन वाझे प्रकरण : शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले ….

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या प्रकरणात दररोज नवं नवीन खुलासे होतं आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्येच मतंमतांतरे पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) सचिन वाझे प्रकरणात शिवसेनेवर दबाब आणत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

एकंदरीत राज्यातलं चित्र असं असताना, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र याबाबत आता संजय राऊतांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, शरद पवार नाराज आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात वाटले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे बदल होतील, असे मला वाटत नाही.

मी एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. कोणत्याही प्रश्नावर चिंतन करूनच पवार साहेब निर्णय घेतात. यापूर्वीही पवार साहेबांनी अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने शरद पवारांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली नाही. यावेळी त्यांना पोलीस आयुक्तांच्या बदल्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, ‘पोलीस आयुक्तांच्या बदल्याबाबत मी कसं सांगणार? सरकार चालवणारे नेते वेगळे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER