मराठा आणि ब्रिटिशांमध्ये झाले होते युद्ध, आजच्या दिवशी फडकला होता चंद्रपुर किल्ल्यावर ‘युनीयन जॅक’

Chandrapur Fort

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) येथील इंग्रजांच्या युध्दास आज २०३ वर्ष पुर्ण होत असुन आजच्या दिवशी चंद्रपूर किल्लाच्या पठाणुपरा गेटवर इंग्रजांचा ‘युनीयन जॅक’ फडकला होता. चंद्रपूरच्या वैभवावर ब्रिटिशांची नजर होती. तह झाल्यानंतरही किल्ला न मिळाल्याने ब्रिटिशांनी हल्ला चढविला. चार दिवस युद्ध झाले. किल्ल्याला खिंडार पडले आणि चंद्रपूरच्या किल्ल्याच्या पठाणपुरा गेटवर ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ फडकला. या ऐतीहासीक युध्दात अनेक सरदार, सैनीक कामास आली होती. या ऐतिहासिक युद्धात अनेक सरदार, सैनिक धारातीर्थ पडले होते. या युद्धाच्या संबंधातील स्मारक, समाधी अस्तित्वात असून ते या घटनेची साक्ष देतात. या घटनेला आज, रविवारी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत.

भोसल्यासोबत झालेला ‘चंद्रपूरचा तह’ चंद्रपूर येथील शेवटचे गोंडराजे निळकंठशहा यांनी पाळला नाही. त्यामुळे रघुजी भोसले यांना १७५१ मध्ये चंद्रपूरवर चढाई करावी लागली. त्यात निलकंठशहा यांचा पूर्ण पराभव करून त्यास कैद केले व बल्लारपूर च्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. अखेरीस या वैभवशाली राजगोंड राज्याचा अशाप्रकारे अस्त झाला. पहील्या रघुजीने १७५१ मध्ये चंद्रपूरचे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले होते.

चंद्रपूरच्या वैभवशाली किल्लावर व राज्यावर भोसलेबंधु, पेशवे, निजाम या सर्वाचीच वक्रदृष्टी होती. मधला काळा भोसले भाऊबंदकी मध्येच गेला. यानंतर भोसल्याचे राज्य सुध्दा इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. त्यानी १८१६ मध्ये इंग्रजांच्या ‘तैनाती फौजेचा तह’ करून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे जानेवारी १८१८च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दयावे असे ठरले असताना, तो देण्यात आलेला नव्हता. म्हणुन ब्रिटिश सेनेने चंद्रपूरच्या किल्लास ९ मे १८१८रोजी वेढा दिला. ९ मे ते१३ मे पठाणपुरा बाहेरील माना टेकडयावरून तोफेचे मोर्चे बांधले व १३ मेपासुन तोफेचा मारा सुरू केला. भोसलेच्या फौजांनीही तोफांनी प्रतिहल्ला चढविला. सलग चार दिवस हे युद्ध सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणि मजबूत असल्याने शक्य झाले नाही. १९ मे रोजी किल्ला भंगला, त्याला खिंडार पडले आणि २० मे १८१८ रोजी या खिंडारातून सैनिक शहरात आत शिरले. यावेळी भोसले राजांनीसुद्धा आपले सैनिक तयार ठेवले होते. मात्र इंग्रजांच्या युद्धसामग्रीपुढे काहीही टिकाव लागला नाही. आणि ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ चंद्रपूरच्या किल्ल्यावर झेंडा फडकला.

आप्पासाहेब भोसल्यांचा गंगासिंग जाट हे चंद्रपूर येथील विश्वासू किल्लेदार होते. जातीने जाट व त्यांचे आडनांव दिघ्वा होते. येथे मराठा-इंग्रज सैनिकांत तुंबळ युद्ध सुरू झाले. गंगासिंह विराप्रमाणे लढत होते मात्र ते जख्मी झाले. जख्मी झाल्यावर गंगासिगने विष प्राशन केले, कारण कैद केल्यानंतर इंग्रज शिक्षा करतील, याची त्याला कल्पना होती. तसेच मरण्याआधी तिकडे अलीखांन तोपची या गोलदांजाने मेजर कोरहॅम या इंग्रज अधिकारयास मारले. त्यामुळे गंगासिंहला आंनद झाला. जायबंदी स्थितीतही अलिखानला बोलावून त्याच्या शौर्याबदद्ल त्यास योग्य बक्षीस दिले. त्यांनतर गंगासिंह शहीद झाले.

चंद्रपूर शहराची भौगोलिक रचना बघता या शहरास दोन्ही बाजून झरपट व इरई नदीने वेढलेले आहे. पावसाळयात पुर परीस्थीती निर्माण झाली की आजही शहरात पाणी शिरते तेव्हा परकोट नसल्याने हे संपुर्ण शहर पाण्याखाली राहत असावे, त्यादृष्टीने सुध्दा किल्ला-परकोटाचे महत्व चंद्रपूर शहराला आहे. तसेच ब्रिटीश काळात आलेल्या मोठ-मोठया पुरांच्या नोंदी पठाणपुरा गेट व विठोबा खिडकीवर आजही बघायला मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button