वाहतूक पोलिसाची समयसुचकता आली कामास

पळवलेली बॅग दहा मिनिटात मिळवून दिली वापस

औरंगाबाद : शनिवारी दुपारी अमरप्रीत चौकात रिक्षा चालक प्रवाशाची बॅग घेऊन पळून गेला होता. वाहतूक पोलीस सोहेल शेख यांनी समयसुचकता दाखवून ई- चलन मशीनचा योग्य वापर करून रिक्षा मालकाचा शोध घेऊन १० मिनिटात बॅग परत करून दिली.