मातृभाषेत शिक्षण देणारे वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावे – मोदी

PM Modi

सोनितपूर : प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे किमान एक मेडिकल आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावे हे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. ते आसाममधील सोनितपूर येथील कार्यक्रमात बोलत होते.

आसाममध्ये भाजपा सत्तेत आल्यास अशा महाविद्यालयांची पायाभरणी करू, असे आश्वासन त्यांनी येथील जनतेला दिले. मोदी म्हणाले, “ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर आहे.  आसाम त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे चांगली कामगिरी कशी करता येते याचे आसाम हे उत्तम उदाहरण आहे. ”

‘असोम माला’ प्रकल्पाचे उद्घाटन

सोनितपूर जिल्ह्यातील धेकियाजुली येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘असोम माला’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या आर्थिक प्रगतीत आणि दळणवळणामध्ये सुधारणा होण्यासाठी ‘असोम माला’ हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. आसाममधील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना वेग मिळावा यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. बिस्वनाथ आणि चराईदेवो येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या कोनशिलेचेही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER