महाराष्ट्रातून कमीत कमी विमानांची उड्डाणे करा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी चर्चा

Uddhav Thackeray

मुंबई : येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमान उड्डाणाला केंद्राने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी चर्चा केली.

एमआयएएलची योजना सुरू होईपर्यंत आणि विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरू होईपर्यंत २५ मेपासून महाराष्ट्रातून कमीत कमी उड्डाणांना परवानगी द्यावी. हे सध्याच्या परिस्थितीनुसार योग्य ठरेल. आंतरराष्ट्रीय प्रवासी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि विद्यार्थ्यांसाठीच उड्डाणे सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER