यंदा पायी वारी झालीच पाहीजे, तडजोड स्वीकारणार नाही; आचार्य तुषार भोसलेंचा इशारा

MaharashtraToday

मुंबई :- आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या (Ashadi Ekadashi Panduranga) भेटीसाठी आतुर असलेल्या लाखो वारकऱ्यांना यंदाही आषाढी वारी होणार की नाही? आणि पांडुरंगाची भेट होईल की नाही? हीच चिंता सतावत आहे. सरकारने अद्याप वारीबाबत निर्णय घेतला नसला तरी गतवर्षीप्रमाणे प्रतीकात्मक सोहळा करण्यात आला तशीच तयारी प्रशासन व पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोस (Acharya Tushar Bhosale)ले यांनी हा इशारा दिला आहे.

यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीतसमस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकऱ्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी, आणि पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button