खडसेंना पक्षात घेण्यामाग पवारांचं राजकीय गणितं असू शकतात – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे (Eknath Khadse) उद्या दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंना पक्षात घेण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज राऊत यांनी वर्तवला आहे. खडसेंची भूमिका मान्य असल्यानेच राष्ट्रवादीने त्यांना प्रवेश दिला असेल असंही ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं. पवारांनी एकीकडे इतका कठोर निर्णय घेतला असताना दुसरीकडं भाजपमधील एका प्रमुख नेत्याला प्रवेश दिला आहे. त्यामागे त्यांची नक्कीच काहीतरी गणितं असतील.

आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. ४० वर्षांपासून भाजपासाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, त्यांची कुंडली जुळली असेल, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER