लस आहे, पण देण्याची ऑर्डर नाही, मुख्यमंत्र्यांनी अपयश झाकण्यासाठी जनतेला वेठीला धरलंय : अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत रोज भर पडत आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. कोरोनाच्या लसींच्या कमी पुरवठ्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलेले आहे. दरम्यान, भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी कोरोनाच्या (Corona) लसीवरून राज्य सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.

कोरोना लसींचा महाराष्ट्राला कमी प्रमाणात पुरवठा होत आहे, असे सांगून केंद्रावर टीका करणाऱ्या राज्य सरकारला भातखळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये लसी आहेत, पण लसी देण्याची ऑर्डर नाही आहे. ठाकरे सरकारने आता कोरोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, किती हा बेशरमपणा???” असा टोला त्यांनी ट्विटवरून लगावला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच राज्याला दर आठवड्याला किमान ४० लाख डोस मिळाले पाहिजेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली आहे. मात्र, केंद्राकडून कोरानाच्या लसींचा पुरवठा होत नाही आहे, असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button