मातृत्वपेक्षा या जगात दुसरं काही श्रेष्ठ नाही : अनुष्का

Anushka Sharma.jpg

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे. विराटने २७ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर ही गुड न्यूज दिली होती. ‘आणि मग, आम्ही तीन! जानेवारी २०२१मध्ये आगमन होत आहे, असे विराटने लिहिले होते. अनुष्काने इंस्टाग्रामवर मातृत्व पेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नसल्याचे सांगत चाहत्यांना यांची माहिती दिली आहे.

अनुष्का आणि विराटने ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले होते. यानंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. सध्या अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का समुद्राच्या लाटाजवळ उभी असून ती बेबी बंपसोबत दिसत आहे. या फोटोसोबत अनुष्का मातृत्व बद्दल लिहिले आहे की, ‘जीवनात निर्मितीपेक्षा वास्तविक आणि आनंददायक काहीच नसते. जेव्हा…’ अनुष्काने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. विराटने ही या सुंदर फोटोवर ‘माझे संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये’. अशी टिप्पणी केली. यानंतर अनुष्का आणि विराटला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER