चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला वेळ नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोमणा

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यात थिल्लरपणा करू नका, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना उद्धव ठाकरेयांनी फडणवीसांना टोमणा मारला – शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझे लक्ष आहे; चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषेदत बोलत होते. ना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला.

उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खचून जाऊ नका, धीर धरा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.

मदत किती, कशी? कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होत आले आहेत. आढावा घेणे सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणासुदीला राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही. केंद्राकडून जीएसटी येणं बाकी आहे. पण दोन दिवसात निर्णय घेण्यात येही.

तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाईसाठी तात्काळ मदत घोषित केली. त्याचे वाटपही सुरू झाले. या मुद्यावर ठाकरे म्हणाले, चांगले आहे. माझा एक स्वभाव आहे, जे करायचं ते व्यवस्थित करायचे. जोरात सुरूवात करायची, नंतर अडकले; त्याचा काही उपयोग नाही. जाहीर करायचे व करू नाही शकलो, तेही उपयोगी नाही. जे करू ते ठोस व ठाम करू. मुंबईत काम सुरू आहे. एक दोन दिवसात दसरा आहे. नंतर दिवाळी आहे, अशा स्थिती मी जनतेच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER