ठाकरे सरकारला कुठलाही धोका नाही; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची माहिती

Sharad Pawar & Sanjay Raut

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) उद्भवलेली बिकट परिस्थिती, राज्यात निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) धारेवर धरले आहे. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चेसह कोरोना परिस्थितीबाबत बोलणं झाल्याची माहिती राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या भेटीबद्दल माहिती देताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत नेहमीच भेट होत असते. आजही नियमित भेट होती. महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. निर्बंध असतानाही रस्त्यावर लोकांची गर्दी होत आहे, अशी माहिती पवारांनीच मला दिली. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यावर चर्चा झाली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र त्यांची माहिती देणे शक्य नाही. पण महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. विरोधकांनी कितीही आरोप केले, राज्यपालांची भेट घेतली तरीही सरकार डगमगणारे नाही, असा दावाही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; प्रसाद लाड यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button