कोरोनाचे मृतदेह टाकण्यासाठी मुंबईत तशी नदी नाही, महापौर पेडणेकरांचा टोला

Yogi Adityanath - Kishori Pednekar

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशात झालेल्या करोना मृत्यूंवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टोला हाणला. कोरोनाचे (Corona) मृतदेह नदीत सोडण्यासाठी मुंबईत तशी नदी नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपाशासित उत्तर प्रदेशवर जोरदार टीका केली. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेकडो मृतदेह गंगा नदीमध्ये तरंगताना आढळून आले होते. त्यातील बहुतेक मृतदेह नदीकिनारी पुरण्यात आले होते, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईत करोनाचे आकडे लपवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे यावर पेडणेकर म्हणाल्या, आम्ही कधीही करोना मृत्यूंची संख्या लपवली नाही. आम्ही मुंबईत असे कधी करणार नाही. आमच्याकडे मृतदेह सोडण्यासाठी तशी नदी नाही. आम्ही त्या कुटुंबांचा सन्मान करतो आणि नियमांनुसार मृत्यूचे प्रमाण पत्र देतो,असे महापौर म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button