‘इथे पाकिस्तानचे राज्य नाही, पाटीलकी गेली म्हणून मुश्रीफांना पुढे केलं का?’ – जयश्री पाटील

Hasan Mushrif - Jayashree Patil - Sanjay Raut

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला असून आज सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहे. या सर्व घडामोडीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सीबीआयच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांच्या या शंकेमुळे अ‌ॅड. जयश्री पाटील (Jayashree Patil) चांगल्याच संतापल्या. त्यांनी ‘मुश्रीफ यांना सांगायचंय, की या महाराष्ट्रात पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही. पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ? जे पुढे येऊन रोज बोलत आहेत. त्या सगळ्यांची नावे पुढे येणार आहेत’, अशा कडक शब्दांत त्यांनी दोघांचाही समाचार घेतला. टीव्ही-९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या की, ‘हायकोर्टाच्या आदेशानुसार परिच्छेद ४१, ८२, ८३ नुसार सीबीआयला कारवाईची परवानगी देण्यात आली आहे. संजय राऊत, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी न्यायालयाचे आदेश वाचावे. त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. यांनी दिशाभूल करण्याचे काम करु नये. तसेच ऊच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा प्रसार करू नये’, असे जयश्री पाटील म्हणाल्या.

यावेळी पुढे बोलताना जयश्री पाटील यांनी त्यांचा जीविताला धोका असल्याचा दावा केला. ‘अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हा सत्याचा विजय झाला आहे. कोणीही कोर्टाच्या कारवाईत हस्तक्षेप करु नये. तसेच कोणीही कायद्याबाबत दिशाभूल करत असेल तर ते सहआरोपी होऊ शकतात. अनेकजण मला धमकी देत आहेत. माझ्याही जिवाला धोका आहे, ऊद्या हे माझ्या कुटुंबाचा घात करू शकतात. त्यामुळे सीबीआयने तातडीने कारवाई करावी,’ अशी मागणीही जयश्री पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button