बुलडाण्यातील स्मशनात जागा नाही; मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढले

Buldana cemetery

बुलडाणा :- बुलडाण्यात (Buldana) वैकुंठधाम स्मशानभूमीत (Buldana Cemetery) पुरलेल्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोकाट कुत्रे जमीन उकरून मृतदेहांचे अवयव तोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मृतदेह उकरून कुत्र्यांनी फरफटत नेले

बुलडाणा शहरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जाऊन तिथे दफन केलेले मृतदेह उकरून काढतात. त्यानंतर ती फरफटत नेतात. तर काही मृतदेहांचे अवयव तोडतात. काही मृतदेहांचे सांगाडे परिसरात पडलेले आढळल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.

संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

बुलढाणातील वैकुंठ स्मशानभूमीत सध्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीकडे कोणाचेही लक्ष नाही. तिथल्या एका समाज पुढाऱ्यांनी समोर येऊन या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि संरक्षण भिंतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मृतदेहांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी जनसामान्यांमधून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button