या देशात मूर्खांची कमतरता नाही… मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेतील गर्दीवर स्वरा भास्करचा संताप

Swara Bhaskar - Maharashtra Today

मुंबई : देशात कोरोनाची साथ जोरात असताना उत्तरप्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आली होती. या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सार्वजनिक विषयावर मत मांडणारी अभिनेत्री स्वरा भास्करने हा गर्दीचा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला – या देशात मूर्खांची कमतरता नाही.

स्वराने एक ट्विट रिट्विट केले – मुस्लिम धर्मगुरू हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊन असतानाही लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत “या देशात मूर्ख लोकांची कमी नाही! निर्लज्ज अशिक्षित लोक!” असे ट्विट केले. स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button