कोणत्याही क्षेत्रात लसीचा तुटवडा नाही : डॉ. हर्षवर्धन

corona vaccines- Dr. Harshavardhana

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे लसीकरणावर (corona vaccines) भर दिला जात आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) देखील उपस्थित होते.

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत आहे. बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के आहे. सर्व गोष्टी पुन्हा सुरू झाल्या असून, लोकांचे निष्काळजीपणे वागणे चिंतेची बाब आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करावा

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत शासनाने निर्देश द्यावेत, असे विविध मुद्दे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी मांडले.

दरम्यान, २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही या मागणीचा पुनरुच्चार केला. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसत आहे. या वयोगटाला विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button