सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Vijay Wadettiwar

मुंबई : कोरोनामुळे राज्य सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला झाले आहे. पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यांच्या या माहितीनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान, आता वडेट्टीवार यांनी घुमजाव केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार मागे-पुढे होऊ शकतो. मात्र त्यांच्या पगारात कपात केली जाणार नाही. सोबतच कोरोनाच्या उपयोजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. तसेच पूरग्रस्तांना राज्य सरकारतर्फे मदत दिली जाईल अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER