जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसरोग तज्ञच नाही

thane news

ठाणे :- प्रतिनिधी बदलत्या जीनव शैलीमुळे वाढता मानसिक ताणतणावामुळे आत्माहत्यासारखे टोकाचे पावले उचलण्यात येत असतात. अशा रुग्णांचे समुपदेश करीत त्यांना जीवन जगण्याचा नवीन मार्ग दाखवणारे मानसोपचार तज्ज्ञच मागील सहा ते सात महिन्यांपासून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात आत्महत्या सारखे टोकाचे पावले उचलेले व त्यात बचावलेल्या रुग्णांचे समुपदेश करण्याच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार जानेवारील 2019 ते ऑगस्ट 2019 या आठ महिन्यात केवळ 29 जणांचे समुपदेशन करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

दिवसेंदिवस बदलती जीवन शैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच घरगुती छोटया-मोठया कारणातून होणार्‍या वादामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पावले उचलणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या घटनांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून पुढे आले आहे. तसेच मागील चार वर्षात आत्महत्येचा प्रय करणार्‍या 456 जणांचे प्राण वाचवल्याची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांकडून रुग्णांसोबत जिव्हाळ्याचे नाते जपले जात आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये प्रत्येकाचे जीवन एका माशाप्रमाणे जणू अडकत चालले आहे.

तसेच नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा अपमान, प्रेमभंग सारखे प्रकार किंवा एखादी मनासारखी गोष्ट न मिळाणो या आणि अन् काही गोष्टींमुळे माणूस हा मानसिक ताणतणाव खाली दिवसेंदिवस जाताना दिसतो. त्यातून तो कळत न कळत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यासाठी उंदीर मारण्याचे विषारी औषध किंवा फिनेल सारखे द्रव्य प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात येते. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ मंडळींमार्फत जानेवारी 2019 र्पयत समुदेशन केले जात होते.

मात्र, त्या मानसोपचार तज्ज्ञांनी राजीनामा दिला. त्यानंतर रुग्णालयात येणार्‍या रुग्णाला ठाणे जिल्हा मनोरुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ बोलून त्यांच्यावर सुमदेशन केले जाते. तसेच रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय व मनोविकृती) श्रीरंग सिद हे तज्ज्ञ डॉक्टरांना मदत करत अशा रुग्णांना आशेचा नवीन किरण दाखविण्याचे काम करीत आहेत.