मला आणि पवारसाहेबांना यापूर्वीही नोटिसा आल्या आहेत : सुप्रिया सुळे

Supriya Sule-Sharad Pawar

पुणे : मला, पती सदानंद सुळे, पवारसाहेबांना (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे यांना नोटीस आली आहे. या नोटिसांना आम्ही सविस्तर उत्तर देऊ. ज्या दिवशी आम्हाला ही नोटीस आली त्याच दिवशी वर्षभरापूर्वीही एक नोटीस आली होती. जे सबंध महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले आहे आम्ही आमचे काम करू, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीस संदर्भात दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात आता ड्रग्ज अँगल (Drugs Angle) समोर आले आहे. यात बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबीकडून (NCB)चौकशा सुरू  आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले आहे . केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवं, असं सुळे यांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्हा परिषद येथे एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. या गोष्टी झाल्यास तरुण वर्ग ड्रग्जसारख्या गोष्टींपासून दूर राहील. सध्या ड्रग्जप्रकरणी हाय प्रोफाईल तीन महिलांना चौकशीसाठी बोलावून, यामधून काहीही साध्य होणार नाही. याला मुळापासून उखडणे गरजेचे आहे, अशी भूमिकाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.

ही बातमी पण वाचा : हे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER