‘वकिली सोडून न्यायाधीशपद स्वीकारल्याची मुळीत खंत नाही’

Justice Dr. Dhananjaya Chandrachud
  • न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले मनोगत

नवी दिल्ली : वकिली सोडून न्यायाधीशपद स्वीकारण्याच्या निर्णयाची मला कधी क्षणभरही खंत वाटली नाही की त्याचा फेरविचार करावासा वाटला नाही. न्यायाधीश म्हणून आम्ही रोज आणि खास करून सोमवारी व शुक्रवारी नेहमीची कामे करत असतो. पण न्यायाधीशाच्या आयुष्यात त्याला त्याच्या कामातून मिळणारे समाधान सर्वात जास्त महत्वाचे असते, असे मनोगत सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) ज्येष्ठ न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड (Justice Dr. Dhananjay Chandrachud) यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सैन्यदलांमध्ये महिला अधिकाºयांना ‘परर्मनन्ट कमिश़न’ देण्यासंबंधीच्या प्रकरणाची न्या. एम. आर. शहा यांच्यासोबत सुनावणी सुरु असताना न्या. चंद्रचूड यांनी गतकाळात रमून जात मन मोकळे केले. न्या. डॉ. चंद्रचूड म्हणाले की, ‘लॉकडाऊन’ सुरु होण्याच्या काही दिवस आधी सैन्यदलांत महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने ‘पर्मनन्ट कमिशन’ची संधी देण्यासंबंधीचे निकालपत्र लिहित होतो तो दिवस माझ्या चांगला स्मरणात आहे. त्या निकालाने ३६५ महिला महिला अधिकाºयाना लष्करात ‘पर्मनन्ट कमिशन’ मिळू शकले. न्यायाधीश म्हणून मला याचे खूप समाधान आहे.  हा केवळ किती महिलांना लाभ मिळाला याच्या आकडेवारीचा प्रश्न नाही. सार्वजनिक जीवनात पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून बरोबरीने काम करण्याचे आणखी एक क्षेत्र यामुळे महिलाांना खुले झाले ही मोठी गोष्ट आहे.

ते असेही म्हणाले की, अर्थात वकिली करत असता तेव्हा हवे तेव्हा काम बंद ठेवण्याचे स्वातंत्र्य तुम्ही घेऊ शकता. न्यायाधीश झाल्यावर मात्र तसे करता येत नाही. न्यायाधीश झाल्यावर जणू तुम्ही बाधले जाता. पण न्यायाधीशपद तुमच्या अंगात भिनते हे मात्र खरे. मला स्वत:ला तरी न्यायाधीशपद स्वीकारण्याच्या निर्णयाची कधीही खंत वाटलेली नाही.

न्या. चंद्रचूड म्हणाले की, न्यायाधीशपद हे पैशाकडे पाहून स्वीकारता येत नाही. त्यासाठी तशी मानसिकता लागते. मुंबईत असताना मी याविषयी तरुण वकिलांना विचारायचो. पण न्यायाधीश होण्यास ते फारसे उत्सूक असल्याचे मला जाणवले नाही. न्यायाधीश झाल्यावर कमी होणारी कमाई हा कदायित त्यामागचा विचार असेल. पण न्यायाधीश झाल्यावरही मुलांचे शिक्षण व अन्य कौटुंबिक जबाबदाºया पार पाडण्याएवढे पैसे मिळतात. तेही पुरेसे असतात.

न्यायासनावर शेजारी बसलेल्या न्या. एम. आर. शहा यांनीही न्या. चंद्रचूड यांच्या म्हणण्याशी सहमती दर्श विली. ते म्हणाले की, न्यायाधीश म्हणून काम करण्यातून मिळणारे समाधान महत्वाचे असते. वकील म्हणून तुन्हाला हे समाधान मिळत नाही कारण तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या अशिलाच्या हिताचा विचार करत असता. न्यायाधीशांना समाजासाठी काही तरी केल्याचे समाधान मिळते.

न्या. शहा पुढे म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयात असताना दिलेल्या माझ्या एका निकालाने २३,५०० निवृत्त प्राथमिक शिक्षकांना फायदा झाला. त्यानंतर मला ग्रामीण भागातील एका विधवेचे पत्र आले. ‘अजून न्याय जिवंत आहे’ एवढे एकच वाक्य तिने पत्रात लिहिले होते. त्याने कृतकृत्यतेचे समाधान मिळाले.

वकिलांचे योगदानही महत्वाचे

वकिलांच्या कामाचीही प्रशंसा करताना न्या. चंद्रचूड म्हणाले की, आम्ही या बाजूला बसून वकिलांकडे पाहात असतो. वकील किती मेहनत घेतात हे आमच्या निकालपत्रातून प्रतिबिंबित होत असते. न्यायालयाचा दृष्टिकोन तयार करण्यात वकिलांचे मोठे योगदान असते. अर्थात काही वेळा आम्ही दोन्ही बाजूंचा नंतर साकल्याने विचार करतो तेव्हा आमचे मत वेगळे छरू शकते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER