मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; बीएमसी आयुक्तांची माहिती

Iqbal Singh Chahal - BMC

मुंबई :- शहरात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईकरांवर (Mumbai) सध्या लॉकडाऊन (Lockdown) लादण्याची गरज नाही, असे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईकरांनी कोरोनाचे नियम गांभीर्याने पाळले नाही, तर भविष्यात कडक निर्बंध लावण्यात येईल, असा इशाराही इकबालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिला आहे.

मुंबईतील स्थिती सध्यातरी हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लगेच लॉकडाउन लावण्याची गरज नाही. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर, पुढे निर्बंध लागू शकतील. कोविड चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. 8 फेब्रुवारी २३ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. याआधी जानेवारीपर्यंत १० ते १२ हजार चाचण्या होत होत्या. आता चाचण्या सातत्याने वाढत आहेत. प्रत्येक १०० चाचण्यांमागे ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्के आहे. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. काही राज्यात लॉकडाउन करण्यात आल्या आहेत. मात्र, मुंबईत ही स्थिती नाही, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा :  नाशिकमध्ये नवे निर्बंध!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER