‘सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो’, चंद्रकांत पाटलांचे लक्षवेधी विधान

Chandrakant Patil

पंढरपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधी विधान केलं आहे. परमबीर सिंग (Parambir Singh) प्रकरणात आता ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) पण एंट्री करणार असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असं विधानही त्यांनी केलं आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक आणि मोठं विधान केलं. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयची एंट्री होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना टोला लगावला. आम्ही रात्री अथवा दिवसा सत्तांतराची स्वप्ने बघत नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून रोज रस्त्यावर उतरतो, असं सांगतानाच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button